आवाज.लोकशाहीचा…..यवत,…
दौंड तालुक्यातील यवत पोलिसांच्या हद्दीत महिन्याला ७ कोटी ५० लक्ष रुपयांच्या अधिक दारूची विक्री होत असून संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यातील विक्रीचा आकडा काढल्यास ती रक्कम किती होईल याचा अंदाज लावणे अवघड आहे
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ५० महसुली गावे असून अधिकृत स्वरूपाने दोन वाईन शॉप ७१परमिट रूम बियर बार नऊ देशी दारू विक्री आणि १ताडीचे दुकान असा पसारा आहे.
हद्दीत केडगाव आणि यवत या ठिकाणी दोन वाईन शॉप.आहेत,
तेथून पिंपळगाव,राहू देलवडी,पारगाव, नानगाव , भरतगाव बोरीआयंदी,डाळिंब बोरीभडक आदी गावांच्या वाड्या वस्त्या येवत येथील वाईन शॉप मधून आणि केडगाव येथील वाईन शॉप मधून दारू विक्रीसाठी नेली जात आहे याचा सरासरी विक्रीचा आकडा अंदाजे काढले असता हे दोन्ही वाईन शॉप दिवसाकाठी दहा लाख रुपयाचा धंदा करीत आहेत अशा स्वरूपाची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
दिवसाकाठी दोन्ही वाईनचे मिळून दहा लाख हिशोबात घेतल्यास महिन्याची विक्री साधारण ३कोटी.आसपास जाते . जवळपास ७१ परमिट रूम बियर बार मधून रोज १००. कोर्ट्स विकली केली जाते कमीत कमी १५० रुपये आणि जास्तीत जास्त पाचशे रुपये अशा किमतीच्या या कॉटर्स सरासरी दीडसे रुपयांनी पकडल्या तरी दिवसला १५ हजार आणि महिन्याकाठी ७१ परमिट रूम आणि बियर बार ३ कोटिअधिक रुपयांच्या दारुंची विक्री करत आहे,
देशी दारूच्या ९ दुकानातून जवळपास.दिवसाला.१६० बॉटल (चार बॉक्स) ची विक्री केली तरी त्यांना प्रती दिवशी सरासरी दिवला ९ दुकाने दिवसाचा धंदा सरासरी २ लाख होतो त्यांची विक्री अंदाजे महिना १८लाख दि रुपयांची देशी दारू विकतात आकडा काढल्यास ९ दुकानाच्या विक्रीचा आकडा संख्या २ कोटीच्या पुढे जाते .
जवळपास १३ कोटी अधिक महिन्याला फक्त यवत पोलिसांच्या हद्दीतील परिसरात विक्री होत असल्यास संपूर्ण तालुक्यातील दारू विक्रीचा अधिकृत आकडा किती असेल याचा आंदाज लावला पाहिजे .तोच विचार जिल्ह्यातील विक्रीबाबत घेतल्यास दारू साठी खरेदी विक्रीची उलाढाल किती कोटीत असेल याचा अंदाज लावणे अवघड आहे .
या सर्व विक्रेतेकडून काही पोलीस , उत्पादन शुल्क विभाग, राजकीय मान्यवर आदींना काही तरी द्यावेलागते त्याला पाकीट संस्कृती म्हणून संबोधले जाते
यातून किती माया कोण कोण कमवतो हा खरा प्रश्न शोधमोहीम ठरणारी आहे .
……..चौकट……अधिकृत दारू विक्रीचा यवत पोलीस हद्दीतील आकडा पाहता अनधिकृत विक्रीची यात रक्कम मिळवल्या तो मोठ्या प्रमाणात दिसेल नदीपट्ट्यातील गावागावातून आणि यवत पोलिसांच्या पूर्व पश्चिम काही अंतरावरती राजरसपणे हॉटेलमधून दारू अनधिकृतपणे विकली जाते याची माहिती यातील काही पोलीस बांधवांना असून सुद्धा याकडे सविस्तर पणाने दुर्लक्ष केले जात आहे.