भेसळ गुळ निर्मितीला अन्न औषध प्रशासन विभागाचा आशीर्वाद

14

आवाज लोकशाहीचा ……आरोग्याला हानिकारक गुळ बनवणारा प्रक्रिया आणि या प्रक्रियेला खराब साखर पुरवठादार यांना अन्न भेसळ विभागाचा आशीर्वाद असल्याने दौंड तालुक्यात या व्यवसायाला मोठ बळ मिळाले आहे .
महिन्याला या विभागाला न चुकता  पाकीट भेट मिळत असल्याने या व्यवसायाला त्यांच्या कडून आशीर्वाद आहे .
तालुक्यात उसाच्या रसापासून गुळाची निर्मिती.करण्याचा
हा मूळ उद्योग साखरेपासून गुळ निर्मितीकडे वळला आहे .
दापोडी टोल नाक्यावर साखर विक्रीचे केंद्र बिंदू असून याची माहीत शासनाच्या यंत्रणेला सुधा आहे मात्र महिन्याच्या चिरीमिरी मुळे शासन या व्यापाऱ्याचे बटिक झालेली आहे .
दापोडी आणि बोरीपारधी, हंडाळवाडी गांडळवाडी पारगाव गलांडवाडी खामगाव खुटबाव मिरवडी राहू बेट मधील बहुतांश गावे तसेच पिंपळगाव उंडवडी नाथाचीवाडी देलवडी कडेठाण हातवळण कानगाव पाटस यवत कासुर्डी सहजपूर आदी भागांमध्ये साखरेचा सप्लाय दापोडी टोलनाका या केंद्रबिंदू मधून होत आहे.
अन्न व भेसळ प्रशासनाने या परिसरात खराब गूळ निर्मित करताना अनेक वेळा धाडी टाकलेले आहेत मात्र या धाडीच्या कारवाया नक्की आत्तापर्यंत काय झाल्या याची माहिती या कार्यालयाकडून दडपण्यात आलेल्या आहेत,
पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये या विभागाचे मुख्यालय असून तेथून दौंड तालुक्यातील हा सगळ्या व्यवसाय पाहिला जातो त्याच्यावर कंट्रोल ठेवलं जातं की बाबच मोठी कौतुकास्पद आहे .
या विभागाचे अधिकारी महिन्याकाठी ठरलेल्या ठिकाणी येत असतात आणि तिथे बसून शासकीय कामकाज करता करता महिन्याला ठरलेला आपला हिस्सा घेऊन निघून जातात गावपातळीवरती कोणी तक्रार केल्यास तक्रारदाराला या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील त्यांच्या कार्यालयात जावे लागते त्या कार्यालयातून तो तक्रारदार गावात येईपर्यंत सदर व अधिकाऱ्यांनी तक्रार झालेल्या गुऱ्हाळ मालकाला चालकालाही खबर दिलेली असते परिणामी अधिकारी पथकासह ज्यावेळेस येतात त्यावेळेस घटनास्थळाचा सर्व कारभार स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवला जातो ही आत्तापर्यंतची या विभागाची पॉलिसी सर्वश्रुत झालेली आहे पूर्वी उसापासून गुळ बनवणारा प्रयोग लोकहितासाठी होता गुळ हा आयुर्वेदामध्ये मोडत.होता तो आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा गणला जायचा त्याचं मूल्य तेवढेच होते,
मात्र सध्याच्या काळामध्ये केडगाव आणि दौंड परिसरातील काही अपवादात्मक सोडल्यास सर्वत्र अतिशय भेसळ पद्धतीचा रासायनिक प्रक्रियेतील गुळाची निर्मिती केली जाते आणि या गुळ विक्रीसाठी शहरांकडे रवाना करताना चुकीच्या माहितीचे  लेबल लावले जाते ,आज गुळ निर्माण होतो त्या ठिकाणची परिस्थिती स्थानिक नागरिकांना माहीत असल्याकारणाने बहुतांश नागरिक या भागातील गुळ खात नाहीत मात्र बाजारपेठेत आणि शहरी भागात गेलेल्या या गुळाच्या ग्राहकांची संख्या मोठी असल्याकारणाने रोज या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गूळ शहरी भागात जातो आणि तो ग्राहकांना खावा लागतो,  हा आयुर्वेदात मोडणारा गुळ नसून शरीराला बाधक स्वरूपाचा असल्याकारणाने भविष्यकाळात या गुळामुळे आरोग्याच्या अनेक व्याधी निर्माण होणारच यात शंका नाही मात्र याची फिकीर अन्न आणि भेसळ विभागाला अजिबात नाही ही बाब मोठी खेद जनक म्हणावी लागेल त्यांच्या महिन्याच्या पाकीट संस्कृती मुळे या व्यवसायाला मात्र अभय मिळत आहे ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here