कोसळलेला खांब ,आणि भीमा नदी मधील दौंड गार पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे….मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांच्या कबुलिने दौंड बांधकाम विभगाचे पितळ पडले उघड

15

दौंड आवाज लोकशाहीचा ……………. दौंड.गार भीमा.नदिवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे अशी कबुली सार्वजनिक बांधकाम विभागा चे मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांनी  दिल्याने दौंड सार्वजनिक बांधकाम उपविभाग याच्या कारभाराचे पितळ उघड पडले आहे.

पुलाचे बांधकाम.परत नव्याने केले जाणार असा आदेश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिला आहे

तालुक्यात या विभागाकडून प्रेस नोट काढून या प्रकरणातून आम्ही कसे कामकाज करतो अशी मेखी मिरवण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला होता, प्रसार माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळावी हा त्यांचा मूळ या पाठीमागचा हेतू होता त्याचा कावा अतुल चव्हाण यांच्या कबुलीने मातीमोल झाला आहे.
तालुक्यामध्ये या विभागाचे दोन भाग आहेत या दोन्ही भागाच्या कामकाजाची दौंड तालुक्यामध्ये फार मोठी ओरड असून त्यांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांच्या मद्ये कमालीची नाराजी आहे .
मात्र राजकीय आशीर्वादाने तालुक्यात कोणाच्याही आरोपांची फिकीर नकरता बिनधास्त पने जमल तसा कारभार  हे दोन्ही विभाग करीत असल्याने त्यांच्या कारभारातील पुलाचा खांब कोसळणारा प्रकार उघड झाल आहे
विकास कामांना निकृष्ट दर्जाचे करायचे आणि ठेकेदाराची हात मिळवणे करीत त्यात भ्रष्ट कारभार करायचा हा यांचा मूळचा हेतू येवत येथील पोलीस स्टेशन मधील संडास बांधकामांमध्ये उघड झालेला आहे
पंधरा लाखाच्या अंदाजपत्रकीय संडासाचे बांधकाम त्यांनी अवघ्या दीड लाखाच्या आसपासच्या रकमेत गुंडाळून
महिला भगिनिंच्या संडास (बांधकाम)मधेले सुधा त्यांनी खावे(पैसे)ही बाब मात्र मोठी अंचीबित करणारी आहे .
त्याचा तपशील कोणाला पाहिजे असल्यास यवत पोलीस महिला भगिनींच्या संडासच्या बांधकामाचा तपशील आणि त्याच्या आराखडा पाहिल्यास उघड होऊ शकते.
गार आणि दौंड या दोन गावांना जोडण्यासाठी भीमा नदी पात्रात जवळपास २० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पुलाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती,

१५ लाखाच्या संडासाच्या बांधकामात त्यांनाजवळपास १२ लाखाचा भ्रष्ट कारभार करावासा वाटलं त्या विभागाला २० कोटीच्या पुलाच्या कामात काहीतरी अपेक्षा असणारच असा आरोप नागरिक राजरोस पने करीत आहेत.

वरिष्ठ अधिकारी चव्हाण यांनी पुलाचे बांधकाम खराब झाले आहे अशी स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी यांना दिल्याकारणाने या कामाच्या देखरेखीसाठी असणाऱ्या या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या शाखा अभियंतां यांच्या कारभाराचे पितळ उघड झाले आहे .
खांबाची तळापासून व्यवस्थित देखरेख केली गेली नसल्याने तो कोसळला हे कोणाला भविष्य सांगण्याची गरज नाही .
तरीही आम्ही पाहिले वळंब्यात नव्हते मग आम्ही ठेकेदाराला पत्र दिले ते बांधकाम पाडा तुम्ही स्वखर्चाने करा अशा स्वरूपाच्या बतावणीचे पत्र काढून वृत्तपत्रासमोर आमची कार्यप्रणाली चाणक्याची हुशारीची आहे असं चित्र स्पष्ट करण्याचा केविलवाणे प्रयत्न त्यांनी केला आहे .
वीस कोटीच्या बांधकामाकडे या नागरिकांनी धीर गंभीरपणे पाहिलेले नाही हे जर उघडपणे त्यांचेच वरिष्ठ जाहीररीत्या प्रकटन करत असतील तर या दोन्ही विभागाने या तालुक्यामध्ये हजारो कोटींची कामे केलेली आहे या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न हा आता ऐरणीवरचा विषय झालेला आहे.
नानविज येथे पोलीस प्रशिक्षणार्थी बांधण्यात आलेल्या काही इमारती दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दलासाठी बांधण्यात आलेल्या इमारती तालुक्यामध्ये महत्त्वाच्या झालेल्या काही रस्त्यांची परिस्थिती अशा बहुतांश खर्चाच्या तपशीलाकडे चव्हाण यांनी पारदर्शक आणि निस्वार्थ निष्कलंक अशा अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची वेळ आहे अशी अपेक्षा सुद्धा आता नागरिक करू लागलेले आहे गेले काही वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून कार्यप्रणालीत असलेल्या या विभागातील एका अधिकाऱ्याचा प्रशासनाकडून जाहीर सत्कार करून त्याला पदोन्नती देण्यात यावी आणि तालुक्यातून त्याला हद्दपार केलं जावं अशी अपेक्षाही या निमित्ताने होत असताना हे आता घडेल का असा प्रश्न त्या अधिकाऱ्याबाबत नागरिक मत व्यक्त करू लागले आहेत.
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग प्रचंड मोठ्या निधी खर्च करणार विभाग असून त्यांनी गेली दहा वर्षात खर्च केलेल्या विकास कामांची गुणवत्ता तसेच त्याची  गुणवत्ता याची निपक्षपती चौकशी झालिं पाहिजे  अशी मागणी नागरिकांकडून  होऊ लागली असून  पुलाचा खांब कोसळून झालेल्या कामाचा ठपका त्यांच्यावर ठेऊन सर्वांवर कारवाई सुधा केली गेली पाहिजे अशी भूमिका ठाम.पने व्यक्त करू लागले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here