दौंड:आवाज लोकशाहीचा
१९९ दौंड विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व नागरीकांनी मंगळवार २५ रोजी पासून येणाऱ्या ते २४ जुलै रोजी पर्यंत आपल्या मतदार यादीतील छायांचित्रासह दुसरा विशेष दुरुस्ती कार्यक्रम भारत निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार राबविण्यात येणार असून नागरिकांनी नाव पत्ता पत्ता यामध्ये बदलता येणार असल्याची माहिती दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली आहे..
यामध्ये मतदारांचे सर्वेक्षण, नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी सज्ज झाले आहेत.याच महिनाभराच्या काळात नवीन मतदारांची नोंदणी तसेच दुबार मतदार वगळणे, पत्त्यात तसेच नावांमध्ये दुरुस्ती करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानुसार २५ जून ते २४ जुलै या महिन्यात केंद्रस्तरीय मतदान अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. मतदार यादीमधील चुकांची दुरुस्ती करणे,फोटो बदलणे, पत्त्यामध्ये तसेच नावांमध्ये दुरुस्ती करणे, मतदान केंद्रांची सीमा निश्चित करणे, भागयाद्यांची पडताळणी करून नव्या मतदान केंद्रांची निर्मिती करणे असे कामकाज केले जाणार आहे..
यानंतर २५ जुलै रोजी तात्पुरती मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या मतदारयादीवर १ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील.त्यानंतर १९ ऑगस्टला सुनावणी होणार आहे तर २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे…
सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे पक्षाचे यादी भाग नुसार बीएलए नेमणे बाबत सुचना देण्यात आल्या व सर्व राजकीय पक्षांनी सदर माहिम यशस्वीरीत्या पार पाडून सहकार्य करावे असे आवाहन करणेत आले.दौंड मतदारसंघातील सर्व नागरीकांनी सदर मोहीम मध्ये सहभागी घेऊन मतदान यादीतील आपले नाव तपासून आपले यादी भाग क्रमांकचे बीएलओ, तलाठी, यांचेशी संपर्क साधून फॉर्म भरून दयावेत. असे आवाहन मिनाज मुल्ला, मतदार नोंदणी अधिकारी १९९ दौंड विधानसभा मतदारसंघ तहसीलदार अरूण शेलार, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, यांनी केले आहे.
या मोहिमेत काय होणार?
■ मतदार यादी मधील चुकांची दुरुस्ती होणार
■ जुने फोटो बदलणे, पत्त्यामध्ये आणि नावांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार
■ मतदान केंद्रांची सीमा निश्चित करणे
■ भागयाद्यांची पडताळणी करून नव्या मतदान केंद्रांची निर्मिती करणे यांसारख्या प्रक्रिया पूर्ण होणार 1
■ इपिक कार्डमधील चुकांची दुरुस्ती होणार
■ नव्या मतदान केंद्रांचा शोध असा असेल कार्यक्रम ? ■ आजपासून ते 24 जुलैपर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार
■ 25 जुलैला प्रारुप मतदारयादी
■ दावे, हरकती करण्याची नऊ ऑगस्टपर्यंत मुदत
■ 19 ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन हरकती दूर करणार ■ 20 ऑगस्टला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार मतदार नोंदणी..