४० सहकारी मेले मात्र त्यांची देणी दिली नाहित आता आमच्या मरणाची वाट पाहत आहेत का? – भीमा पाटस साखर कारखाना कामगारांचा आक्रोश
पाटस:आवाज लोकशाहीचा..
आमचे ४० सहकारी मेले मात्र त्यांची देणी दिली नाहित आता आमच्या मरणाची वाट पाहत आहेत का? अश्या स्वरूपाचा आक्रोश दौंड तालुक्यातील पाटस येथील भिमा सहकारी साखर कारखाना मधील सेवा निवृत्त कामगारांनी व्यक्त केला आहे..
भीमा पाटस कारखाना स्थळावरील गणपती मंदिराच्या समोर सर्व कामगारांनी बैठक घेतली त्यात हा आक्रोश केला गेला आहे.या बैठकीत जवळपास मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते..
कामगार चळवळीतील हनुमंत वाबळे,कामगार संघाचे अध्यक्ष प्रवीण शितोळे ,माझी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी काळे,सुरेशराव निंबाळकर,शिवाजी दिवेकर, जयसिंग जांबले,आदी प्रमुख म्हणून उपस्थित होते..
साखर कारखान्याने २०१६ पासून आज पर्यंत कारखाना संचालक मंडळाने ४० कोटी रुपयांची विविध स्वरूपाची निवृत्त कामगरांची देणगी दिलेली नाहीत..
४० कामगार मृत पावलेत असताना त्यांच्या परिवारास या देणी मिळतील आणि मला-मुलांच्या भविष्यासाठी पुढील काळात उपयोगी ठरतील हे स्वप्न उराशी बाळगून आज मिळेल उद्या मेळेल या अपेक्षेने आता प्रयत्न वाट पाहत आहेत..
मात्र संचालक बोर्डांच्या भूलथापा त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.आता आजुन किती कामगारांच्या अंत पह्यायचा आहे,आम्ही मेल्यावर देणार आहेत का ? असा आरोप करून त्यांच्या परिवारावर अशी वेळ आली पाहिजे म्हणजे त्यांना त्यांचे दुःख समजेल असे टोमणे सुधा संचालक मंडळासाठी या वेळी मारण्यात आले..
सद्या कारखाना खासगी व्यक्तीला चालविण्यास दिला आहे हा देण्या अगोदर २०२२ रोजी कामगार संघाबरोबर मीटिंग करून संचालक बोर्डाने सर्व देनी दोन सीझन मध्ये देण्यात येईल अशा स्वरूपाचे आश्वासन दिले होते..
हे आश्वासन सुधा हवेत विरले आहे.आता त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही असा टोमणा सुधा त्यांनी मारला असून आगामी काळात देणी वसूल करणे साठी आंदोलन करावे लागले तरी करुया आणि याची सर्वस्वी जबाबदारी संचालक बोर्डवर ठेवली जायील असे मत व्यक्त केले आहे..
तालुक्यात अश्या निवृत्त कामगारांची पाचशे अधिक संख्या आहे या सर्वांना देणी संचालक मंडळाने दिलेली नसल्याने त्यांच्या परीवारावती एक प्रकारे अन्याय केलेले आहे.या सर्वांच्या परिवाराचा तळतळाट या सर्वांना लागेल आणि भविष्य काळात यांच्या जीवनामध्ये या सर्वांना सुख नावाची गोष्ट मिळणार नाही अशा स्वरूपाचा आक्रोश सुद्धा त्यांनी केला..