दौंडच्या सामजिक विकास होण्या ऐवजी ठेकेदार याचाच मोठा विकास झाला आहे ….ज्येष्ठ नेते नंदू पवार यांची दौंड विकासाच्या चर्चेवर टीका….

19
जेष्ठ नेते नंदू पवार

……..  दौंड आवाज लोकशाहीचा ……..

.दौंडला सामाजिक विकास कमी आणि. राजकीय चमच्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे .
राजकीय जोडे उचलणारे गावातील सांगकामे तरुण तालुक्यात नामवंत ठेकेदार होउन मान्यवरांचे आणि अधिकाऱ्यांचे एजेंट झाले आहेत.
अश्या स्वरूपाची जहाल टीका जेष्ठ नेते नदू पवार.यांनी.केली आहे .
दौंड पंचायत समितीत रावनगाव  येथील.जिल्हापरिषदेतील शाळेच्या मुलांनी आम्हाला शिक्षक पाहिजे म्हणुनी आक्रोश केला या प्रसंगाला समजल्यावर पवार पंचायत समितीत आले होते ,त्या वेळी त्यांनी.पत्रकारांशी वार्तालाप केला .
म्हणाले तालुक्यात विकास नावाचा वारू नेत्यांच्या भक्ती पोटी काही अंध मोजक्याच सेवेकरी कार्यकर्त्यांनी बळच  दामटण्याचे काम केले आहे .
नेत्याला उगाच अमका दुत तमका.दुत.उपमा देऊन त्याच्या  प्रचाराला लागले आहेत.

विकास कामांच्या रक्कमां हाजोरांच्या  कोटी या निमित्ताने सांगू लागले आहेत .अशी माहिती त्यांनी तालुक्यात विकास कामे आणि त्याचा प्रचार करणाऱ्यांन
बाबत देऊन ते   म्हणाले .लहान मुलांना रावनगावातून
येऊन आम्हाला शिक्षक द्या असा टाहो फोडावा लागतो आहे .ही बाब अत्यंत गंभीर आहे .दुत नावाची उपाधी देणाऱ्या त्या भक्तांना आणि पदवी दिलेल्या त्या नेतृत्वला  हे  दिसणार नाही,   भक्त.अंध आहेत आणि अंधना दिसणार नाही हे नक्की तालुक्यात या भक्तांना अनेक सामजिक प्रश्नाचा डोंगर झालेला आहे तसेच भ्रष्ट.कारभाराचा कळस झालेला असून त्यांना याची यादी द्यावी लागणार आहे असे बोलताना त्यांनी ,शहरात अनेक वर्ष झाले सार्वजनिक मुतारी बांधता आलेली नाही,
शहरात तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक नागरिक येतात त्यात महिलांचा समावेश असतो त्या महिलांना साधी लघवीची सोय केली.नाही, संपूर्ण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे .आमदार आसलेल्या
राहू गावाला महिन्याला जवळपास ,९ लाख रुपयाचे अधिक पाणी विकत घावे लागते .,अस ऐक गाव नाही त्याला गेली तीस वर्षे शुद्ध पाणी नळाद्वारे मिळत आहे .खर्च मात्र हजार कोटींच्या पुढे आहे,
विकास कामांच्या रक्कमा पाहून झालेली कामे पाहिल्यास त्यांची गुणवत्ता अत्यंत खराब झालेली आहे ,
ही कामे करणारी ठेकेदार मंडळी नेत्यांची हुजरेगिरी करून झालेली आहेत, आजही ते स्वतःला स्वाभिमानी दौंडकर म्हणतात पण त्यांचं जिन पाहता ते लाजिरवाणी जीवन जगत ठेकेदारी करीत आहेत
ज्या तालुक्याला पिण्याचे पाणी नाही शीक्षणाची अवहेलना झालेली आहे गावागावात गटारी नाहीत असा हा तालुका विकासाच्या गप्पा ठोकतो ही अत्यंत भंगार बाबा आहे .
तालुक्यातील युवा वर्ग हाताला रोजगार नाही म्हणून त्रस्त झालेला आहे तो कार्यकर्ता बनून उगाच विकास नावाला घेऊन बोंब मारताना दिसत असून या विकासाच्या बोंबाबोंब मध्ये लाचार ठेकेदार आणि अंध भक्तांचा भरणा निर्माण झाला असून विकासाच्या कामाचे पैसे मात्र भ्रष्ट कारभारात वीभागून गेलेले आहेत ठेकेदार झालेला तरुण राजकीय नेत्याचा आणि शासनाच्या अधिकाऱ्यांचे चमचे बनले आहेत,
यापेक्षा दुसरे काहीच नाही हा तालुका स्वाभिमानी दौंडकर म्हणून आहे की इथे लाचार दौंड करून म्हनावा लागेल अशा स्वरूपाची अवस्था तालुक्याची वस्तुनिष्ठ परिस्थितीची सत्य पाहणी केल्यास खऱ्या अर्थाने उघड झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची खरमरीत टीका दौंड तालुक्यातल्या विकास या प्रश्नावर ती नंदू पवार यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here