जनतेच्या प्रश्नाचा खच पडला असताना , नेता निष्ठेसाठी कार्यकर्त्यांचा टाहो…दौंड मधील.राजकारणात नागरिकांची टीका….

26

.. ………..आवाज लोकशाहीचा ………….
जनतेच्या प्रश्नाचा खच पडला असताना आपल्या स्वतःच्या भल्याचा विचार सुरू आसलेल्या दौंड च्या  राजकारणात काही अंध भक्तांनी नेता निष्ठेचा टाहो फोडला  आहे,

भक्तांनो अरे विचार करा आणि नेत्याचा उदोउदो करा हा सबुरीचा सल्ला त्यांना  सामान्य नागरिक चौका चौकातून देऊ लागला आहे,
कोण कोणाला दुत म्हणून सांगू लागला असून.कोण कोणती उपमा देईल याचा नियम नाही, तालुका यातून तालुक्यात राजकारणाचा धुरळा वाढून समजकरणावर प्रदूषण निर्माण  झाले आहे .
झालेला विकास काही निवडक कार्यकर्त्यांच्या पथ्यावर पडला असला तरी कमिशन नावाखाली भ्रष्ट कारभार  सरकारी पगाराचे अधिकारी यांच्या पथ्यावर पडला आहे असा आरोप ते राजरोस पने करू लागले  आहेत .
तालुक्यात या विषयावर खरं बोलणार याला खोट्या प्रकरणात गोवल जाते याची भीती .राजकीय वातावरणात असल्याने सर्व सामान्य नागरिक कमालीचा शांत झाला असून नेता चमच्यांचे  मात्र सुगीचे दिवस आले आहेत.अशी माहिती नागरिक.देऊ लागले आहेत,
तालुका सद्या विविध सामाजिक सुविधांच्या वेदनांचा रोगी बनला असून त्याचा इलाज करणार  समाज सेवक प्रमाणिक नेता रुपी डॉक्टरची अपेक्षा करीत असताना अंध भक्तांनी आपल्याच नेत्याला  दुत म्हणून पदवी देऊन आम्हीच तुमचे प्रमाणिक भक्त याचा दाखला देत आहेत
भीमा सहकारी साखर कारखान्याचा कामगार आणि सभासद अनेक प्रश्नांनी त्रस्त झालेले असून त्यांच्या प्रश्नांची उकल होण्याचा विषय कोसो दूर गेला असताना कारखाना विकला की गहाण ठेवला याचा तपास त्यांना लागत नाही .
ज्यांनी उभारणी साठी कष्ट घेतले ते आता गेट पर्यंत जाऊ शकत नाहीत .अशी सभासदांची अडचण ऐका बाजूला असली तरी घाम गाळणाऱ्या कामगारांना सेवा निवृत्ती नंतरच्या पैष्या साठी हात जोडावे लागतात ही बाब खेदाची आहे .

तालुक्यात कोणतेच नेतृत्व याची दखल घेत नसल्याने त्यांची ऐकून रक्कम अद्याप पर्यंत मिळाली.नाही ,याचा परिणाम.मात्र वेगळाच झालं असून ती रक्कम
४० कोटीची थकीत झाली आहे, हे पाहता व्यवस्थापन आणि त्यांचा कारभार कसा केला आहे याचे भविष्य सांगण्याची गरज उरलेली नाही .आणि त्यांना याचा जाब विचारणारे नेतृत्व सुधा दिसून आलेले नाही,
घामाचां दाम मिळवण्यासाठी ४० सेवा निवृत्त कामगारांचा मृत्यू सुधा झाला  आहे .याची खंत सुधा कोणीच बाळगली नसल्याने तालुक्यातील या  कामगारांना वाली कोणी आहे का हा प्रश्न मोठा गहाण म्हणावा लागेल अशी चिंता त्यांच्या कडून व्यक्त होताना दिसत आहे 

याची लाज सुधा कोणाला वाटू नये ही बाब तालुक्याच्या नव्हे राजकारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबत शरमेची म्हणावी लागेल अशी शंका उपस्थित करूनआपली कडवट प्रतिक्रिया या बाबत देताना म्हणतात.मयत झालेल्या त्या कामगारांच्या घरच्यांचा तळतळाट या सर्वांना भोगवाच लागेल,


तालुक्यात ऐका ही गावात सत्ताधाऱ्यांनी समाज हिताच्या दृष्टीने महत्वाचे काम केले नाही आणि विरोधकांनी त्याला जाब विचारावा असे दिसून आलेलं नसल्याने केलेल्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न.चिंतेचा विषय झाला आहे ,.
भ्रष्टाचार करता येणाऱ्या कामातील कोटींचा झालेला खर्च तालुक्यातील नागरिकांना दाखवण्यासाठी आणि जाहीर भाषणातून सांगणारा विषय असला तरी त्यातून सुधार कोणाचं झालं हा  विषय शोध मोहिमेचा भाग बनला आहे ,
तालुक्यातील रस्ते आणि झालेली बांधकामे याच्या खर्चाची आकडेवारी पाहता त्या तुलनेत त्या बांधकामाची गुणवत्ता मात्र सांगण्याचे टाळले जात आहे.
या सर्व भानगडी मध्ये भ्रष्ट कारभार करणारा हा तालुका सामाजिक कामापासून प्रचंड लांब राहिलेला आहे परिणामी नागरिकांच्या असंख्य प्रश्नांचा डोंगर झाला असून तो सोडवणार कोण हा प्रश्न ऐरणीवर  असतानाच भक्तांनो कोणत्याही डिग्र्या  आणि उपध्या आपल्या नेत्याला देताना याचा विचार केला पाहिजे  अशा स्वरूपाचा उपदेश आणि संदेश सर्वसामान्य नागरिक आता या भक्तांना देऊ लागले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here