आगामी विधानसभेची निवडणुकीमध्ये  मतदार आणि नेते यांच्यात होणार जुगलबंदी…कोण कोणाला फसवणार नेता मतदाराला की मतदार नेत्याला

11

आवाज लोकशाहीचा

दौंड:प्रतिनिधी

विधानसभेच्या तयारी साठी घोंगडी बैठका मतदारांच्या गाठी-भेटी सह तालुक्यात कृषी मेळावा,महाआरोग्य शिबिर विधवांच्या मदतीची आणि मजुरांच्या साधनसामुग्री पेटीचा कार्यक्रम तालुक्यात जोरदार पने सुरू झाला असून नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

मतदार मात्र सुज्ञ असून तो आपली भूमिका येणाऱ्या विधानसभेतून दाखवून दिल्याशिवाय राहणार अशी परिस्तिथी तालुक्यातील लोकसभेचा त्यांचा कल पाहिल्यावर वाटत आहे.तालुक्यात विविध कार्यक्रम मतदार आकर्षित करण्याच्या हेतूने सुरू असेल तरी मतदार म्हणता आम्ही ठरवल आहे.त्यांच्या अशा अपूर्ण विचाराचा मात्र तालुक्यांतून विचार पडला असून मतदार काय करू शकतो याची चुणूक लोकसभेला दाखऊन दिलेली असल्याने आणि नेत्यांनी सुधा पाहिलेली असल्याने त्यांची चिंता भलतीच वाढली आहे.

सद्या तालुक्यात कोणत्या कोणत्या विषयाने मतदारांना एकत्रित आणायचं कार्यक्रम विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या वतीने सुरू आहे.दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांनी गावागावात बैठका घेऊन मतदारांना आपली भूमिका पटवून देत कार्यक्रम हाती घेतला आहे.या दोन मान्यवरांच्या प्रमुख भूमिकेला अजून तालुक्यात आमदारकीचे डोहाळे लागलेले आप्पा पवार,नामदेव ताकवणे यांनी सुधा कार्यप्रणाली सुरू ठेवली आहे..

भाजपा पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार राहुल कुल हे असण्याची शक्यता असली तरी पक्ष कोणता निर्णय घेईल याची शास्वती देता येत नाही.याचे दाखले पक्ष्याने मागील काळात केलेल्या राजकीय तडजोडी पाहिल्यावर शंकास्पद वाटणे साहजिकच आहे.

शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार कोण असणार याची कोणालाच गॅरंटी नाही.थोरात सद्या अजित पवार गटात आहेत मात्र तिकीट शरद पवार गटाचे घेईल अशी वादळी चर्चा सुरू असल्याने मूळ शरद पवार गटात असलेल्या इच्छुक उमेदवारांना झोप लागत नाही.त्यांच्या जीवाची उलघाल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मधून दिसून येते आहे.ते त्रस्त झालेले असून काही अंश परिणाम म्हणून कुल गटाला सुधा त्याची बाधा झालेली दिसून येते असल्याची त्यांच्या समर्थकांच्या गावागावातून होणाऱ्या चर्चेवरून दिसू लागले आहे..

तालुक्यात विधानसभेची लढत ही थोरात विरोधात कुल यांचीच होऊ शकते अशी शक्यता मात्र अनेक राजकीय अभ्यासक बोलून दाखवत असल्याने येणारी विधानसभा आणि त्यातील लढतीचे अंदाज मतदारांसाठी वादळी चर्चेचा विषय झालेला आहे.

,सद्या तालुक्यात विविध स्वरूपाची शिबिरे आणि कार्यक्रम घेण्याचा सपाटा राहुल कुल यांनी लावला आहे तसेच थोरात आणि अन्य इच्छुक सुधा आपल्या आपल्या युक्तीने मतदारांशी संवाद साधत असेल तरी दौंडचा मतदार कसा आहे याची प्रचिती लोकसभेच्या मतदानातून सर्वश्रुत झालेली आहे.

कोणतीही अमिषणा आणि दबावाला तो बळी नपडता आपली भूमिका निभावून नेतो त्याने ठरवलं की ठरवलं त्याचा अंदाज कोणीच करू शकत नाही त्याला फसवण्याचा प्रयत्न केल्यास तो नेत्यांना फासवतो याची प्रचिती कुल थोरात या दोघानाही पक्की आलेली आहे.

या दोघांनी एकत्रित येऊनही त्यांचे मत दोघानाही वळवता आले आम्ही त्यांनी दोघांच्यांविरोधात मते दुसऱ्याच उमेदवाराच्या पारड्यात टाकली आणि दोन्ही नेत्यांना ऐक प्रकारचा संदेश दिला आमचे ठरले म्हंजे ठरले हा त्यांचा काहीच प्रतिक्रिया न द्या मिळालेला संदेश म्हणल्या स वावगे ठरणार नाही या वरून मतदार येथील कसा सुज्ञ आहे त्याच्या साठी महाआरोग्य शिबीर ,शेतकरी मेळावा,मजुरपेटी वाटप आणि महिलांचा कार्यक्रम तसेच त्याच्या समक्ष घेतलेल्या गाठी-भेठी गौण आहेत.

त्यांना खुश करण्याची किमया भले नेते साधू शकतील मात्र त्यांचा विश्वास संपादन करणे फार महत्वाचे आहे अआणि हा विश्वास सद्या मतदारांना कोण देणार ते कोनची बाजू घेणार हे गुलदस्त्यात आहे.या मतदाराला आपलस करण्यासाठी कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असूद्या त्याला उगाच आमिष दाखवून कोणी फसवू शकत नाही हे पक्के आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here