दौंडची आगामी विधानसभा विविध प्रश्नांनी गाजणार …मतदारांची नावे  यादीतून कोणामुळे कमी…. ?तालुक्यात शंकेचे वादळ

15

आपल्या विरोधातला उमेदवार पाडण्यासाठी होणार षडयंत्र..

आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी

दौंड तालुक्यात आगामी विधानसभा वेगवेगळ्या विषयाने गाजणार आहे अश्या स्वरूपाचे संकेत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उमेदवारांच्या कारभाराकडे पाहून दिसू लागले.आहे  

मतदार नक्की काय करणार याचा अंदाज कोणाला लागणार नाही अशा स्वरूपाची वस्तूनिष्ठ परिस्थिती सध्या तालुक्यात दिसत आहे..

कोणाच घेणार आणि कोणाचं खाणार व कोणाला मत देणार हे त्यांच्या शिवाय कोणाला सांगता येणार नाही

याचीं मात्र खात्री कोणलाच देता येणार नाही अशी अवस्था लोकसभेच्या वेळी झालेल्या मतदानाकडे पाहुण वाटू लागले आहे

मतदार राजा आहे त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही आणि जरी झाली तरी तो आपलं बहुमूल्य मत योग्य त्या ठिकाणी देतो हे त्याने दाखवून दिलेल आहे

निवडणुकीची सद्या चाहूल लागलेली आहे.तालुक्यात कोण उमेदवार आहे याची कोणत्याच पक्ष्याने नावे जाहीर केलेली नाहीत आणि ती प्रक्रिया अजून जाहीर  नाही असे असताना तालुक्यातील राजकीय व्यसनात मद्यधुंद झालेल्या काही तज्ञांनी कोण उमेदवार असणार त्यांना तिकीट कोणाचे असणार याचा हिशोब केला आहे.

काही नेता निष्ठावंत कारभाऱ्यांना आपल्या नेत्याच्या विरोधात दुसरा कोण उभा राहतोय हे ऐकून सुद्धा सहन होत नसून त्यांनी उभे राहणाऱ्या उमेदवाराला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या शकला लढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

यवत गावातून निघालेल्या पोस्ट कार्ड .यातील ऐक कटाचा भाग असू  कोण कोणाला पत्र लिहिणार आणि कोण कोणाचा निष्ठावंत हे त्यांनी स्वतःच ठरवल्यामुळे हे पत्र नक्की कोण काढतोय हे पत्र काढण्यासाठी कोणाला बाधा झालेली आहे आणि या पत्रा मागचा मास्टर माईंड कोण आहे यावर आता आयोग नेमण्याची वेळ आली आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये आता खोलवर रुजलेल्या नेत्याच्या प्रेमासाठी त्यांनी जीवाचं रान सुरू केला असून सोशयल मीडिया वरती आपल्या बुद्धीची कस लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.निवडणुकीचे नुसते वारेच वाहत आहे अजून कार्यक्रमाची तारीख आयोगाकडून स्पष्ट झालेली नाही.

तालुक्यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांच्या भालदार चोपदारांनी विविध उपाय योजना सुरू केले आहेत

तालुक्यातल्या पच्छिम पट्ट्यातील गावात एका नेत्याच्या वतीने मतदारांचे ओळखपत्र तयार करणे मतदार यादीमध्ये नाव घुसवणे काहींची नावे कमी करणे आधार कार्ड तयार करून देणे अशा विविध कार्यक्रमाचा सपाटा सुरू आहे अशी माहिती सुद्धा मिळत आहे मात्र ती खरी की खोटी ते तपासणे गरजेचे आहे

दौंड तालुक्यात ३१ हजार मतदारांना कमी करण्यात आलेले आहे अशी तक्रारच पाटस गावातील कार्यकर्ते वसंत साळुंखे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे

राज्यातील हा एकमेव मतदार संघ आहे.यापूर्वी मागील पंचवार्षिकला सांगली मतदारसंघां मध्ये हा प्रयोग झाला होता अशी माहिती खुद्द दौंडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिलेली आहे.

मात्र मुल्ला हे त्यावेळी सांगली मतदार संघामध्ये शासनाच्या सेवेत होते त्यांचा हुद्दा त्यावेळी  सद्या असलेल्या पदाचा न्हवता

मात्र त्या  ठिकाणी कार्यरत होते.मतदार यादीतून ४१ हजार मतदार कमी करण्याचा कार्यक्रम झाल्याची माहिती त्यांना आहे आणि ते सध्या दौंड मध्ये उपविभागीय अधिकारी प्रांत पदभार सांभाळत दौंड विधान सभेचे अधिकारी म्हणून पाहत  आहेत

तालुक्यात सध्या ३१ हजार मतदार संख्या कमी होणे म्हणजे सांगली जिल्ह्यातला प्रयोग दौंड तालुक्यात झाला का आणि तो कुणी केला अशा स्वरूपाच्या शंका-निर्माण होणे साहजिकच आहे.

मुल्ला हे शासनाचे प्रतिनिधी असून त्यांना याबाबत काही देणं घेणं नसते त्यांनी निवडणूक आयोग यांच्या नियमांना अन्सरून कामकाज केलेलं असणार यात शंका असू शकत नाही.

सांगलीत ते सेवेत असताना झालेला प्रकार आणि दौंड मद्ये घडलेला प्रकार हा केवळ योगायोग समजला पाहिजे ३१ हजार मतदारांची नावे  कमी करण्यामागचं षडयंत्र कोणी रचलं हा प्रश्न सुटावा म्हणून मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे साळुंखे यांनी तक्रार केलेली आहे.

या तक्रारीचा निवडणूक आयोगाने सखोल विचार करून सोडवण्याचा प्रयत्न केल्यास दौंड तालुक्यामध्ये या घटनेचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही

मतदारांची नावे कमी करण्या पाठीमागे नक्की काय हेतू असला पाहिजे,की या मतांनी पराभवाची कोणत्या नेत्याला भीती वाटते का ? अशी शंका कुशंका सद्या वादळी चर्चेचे स्वरूप घेऊ लागली आहे

काही मतदारांची नावे या गावातून त्या गावात त्यांची कशी टाकली गेली हा सुद्धा प्रयोग इथे करण्यात आलेला आहे यामध्ये ताम्हणवाडी गावाचा दाखला घेता येईल.

ताम्हणवाडीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांनाच मतदार यादीतून वगळण्यात आल्याची तक्रार झालेली आहे आणि ८० मतदार ही बोगस नोंदवण्यात आलेले आहेत अशी ओरड आणि तक्रार झालेली आहे

वाढीव मतदार कोण कसे कुठले आणि का आहेत याची चौकशी मात्र मतदार यादी वरती असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची बाब आहे त्यावर अधिक बोलणे हा भाग सामान्य नागरिकाचा नसला तरी ज्यांचे यादीतून नाव गेलेला आहे त्यांना याबाबत लढा देणे काळाची गरज आहे.

विधानसभेची निवडणूक प्रोग्राम लागण्याच्या अगोदरच अशा विविध प्रश्नाने  ती गाजू लागलेली आहे मतदार यादीतील नावे कमी होणे आणि ताम्हणवाडी मध्ये अचानक ८० नाव वाढणे याबाबत माजी आमदार रमेश थोरात यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून तक्रार सुद्धा केलेली आहे

या सर्व प्रकरणातून ही निवडणूक आता महत्त्वाची नसून कोणीतरी प्रतिष्ठेची केली आहे आणि ती प्रतिष्ठा जपण्यासाठी जमेल ते करण्याचा विडा जणू उचलला की काय असा प्रश्न या सर्व घडामोडी वरून निर्माण झालेला आहे.

गेली पाच वर्षांमध्ये सामाजिक सुविधांचा किती लाभ मिळाला हे त्यांच्या डोक्यात असले तरी निवडणुकीच्या काळात किती लाभ मिळणार या त्यांच्या आशा मोठमोठ्या असून कोणाचे घ्यायचे व कोणाला मत द्यायचे हे त्यांनी मात्र ठरवलं आहे यात शंका बाळगण्याचे कारण नाही

ज्यांना शंका वाटते त्यांनी.लोकसभेचे मतदान पाहिल्यावर ती संपल्या शिवाय राहणार नाही

येणारी विधानसभा निवडणूक विजयी होण्यासाठी उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत मतदारांचा विश्वास जिंकावा लागणार आहे मतदार आपलेसे करण्यासाठी वेळप्रसंगी वेगवेगळी आश्वासने आणि अमिशे सुधा देण्यास ते मागे पुढे पाहणार नाही आणि कमी पडणार नाहीत आणि हे सर्व करण्यासाठी आपले अंध भक्त त्यांनी कामाला लावले आहे .

त्यांच्या झोपा उडालेल्या आहेत.तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुक आणि सोशल मीडिया वरती आपली ताकद खर्च करण्यासाठी लावलेली आहे या सर्व घडामोडी मध्ये दौंडचे मतदार मात्र सुज्ञ झालेले आहेत त्यांनी पहिला झटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानातून दिलेला आहे.

हा बोध नेत्यांनी बगलबच्चांनी व कार्यकर्त्यांनी घेतला आहेच याची कोणालाच शंका असावी असे काहीच राहिले नाही म्हणून मतदार आता सुज्ञ झालेला आहे घेणार ऐकाच खाणार ऐकाच आणि मतदान करणार ऐकला याची भविष्य वानी राजकीय अभ्यासक अंध-भक्त आणि राजकीय व्यसन जडललेना सांगावं लागणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here