कर्नाटकी हातात दिलेल्या साखर कारखाना कामगार सभासदांच्या धोक्याचा ..कामगार प्रतिनिधी हनुमंत वाबळे………

21

कर्नाटकी आणि महाराष्ट्रातील प्रांतिक लढाई अनेक वर्षे सर्वसृत असताना महाराष्ट्रातील लोकांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना कर्नाटकी माणसाच्या हातात देण्याचे पाप महाराष्ट्रातील विधानसभेतील प्रतिनिधी करतो ही बाबच खेद जनक आहे..महाराष्ट्रावर प्रेम करण्याचे सोडून हा कर्नाटकी लोभ कामगारांनाच काय ऊस उत्पादक सभासदांना ही धोक्याचा आहे..जेष्ठ कामगार प्रतिनिधी हनुमंत वाबळे..

आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

व्यापार करायला इंग्रज भारतात आले आणि मालक झाले दिडशे वर्ष राज्य केले अति केल्याने त्यांना देश सोडून जावे लागले,त्यांनी चाबूक हातात घेऊन कामगारांकडून कामे करून घेतली मात्र पगार वेळेवर दिले.इथं मात्र त्यांच्या पेक्षा भयानक परस्थिती आहेत. तिला वठनिव आणण्यासाठी एकजूट केली.पाहिजे आणि एकजुटीचा वज्र मुठीला बांधून लढाई साठी  आवाज लोकशाहीच्या मार्गाने उठवला आहे

आमच्यातील कोण ? सध्या चुघली करून नोकरी करत आहे ,त्या चुगली खोराल आणि  कान फुंकणाऱ्याला पण भविष्यात  हीच अडचण होणार आहे त्यांनी लक्षात ठेवावे अशा स्वरूपाच्या प्रखर टीकाटिपणीने आज भीमा सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांनी कारखाना स्थळावर करून चक्री उपोषणास सुरुवात केली आहे..

सेवानिवृत्त कामगारांचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापनाकडून साधारण ५५ कोटी रुपयांपेक्षा आसपास थकीत देणी शिल्लक राहिलेली आहेत,रक्कम मिळवण्यासाठी या कामगारांनी विविध स्वरूपाचा लढा गेली अनेक वर्ष विविध मार्गाने सुरू ठेवला आहे.या मद्ये ५५ पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला असून अद्याप त्यांना त्यांची सेवानिवृत्ती नंतरची देणी दिलेली नाहीत..

कारखान्याचे चेअरमन विद्यमान दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या व्यवस्थापन प्रक्रियेतील सहकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने न पाहिल्याने अखेर 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त सेवानिवृत्त सर्व कामगारांनी ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यां बरोबरच्या मार्गदर्शनाखाली कारखाना स्थळी चक्री उपोषण सुरू केलेले आहे…

प्रारंभी या चक्री उपोषणासाठी जमलेल्या सर्व कामगारांनी मिळून जाऊन साखर कारखान्याच्या स्थळी असलेल्या संस्थापक स्वर्गीय मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत पुतळ्याजवळ एक छोटी मीटिंग घेऊन हे कशासाठी हे चालू आहे या विषयाची थोडी माहिती उपस्थितांना त्यांना दिली आहे…

यावेळी वाबळे म्हणाले या देशावरती इंग्रज व्यापार करण्यासाठी आले होते ते नंतर मालक झाले मालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये जुनून अन्याय-अत्याचार करण्यास सुरुवात केली त्याचा विपरीत परिणाम घडला आणि त्यांना इथून जावे लागले आहे त्यांना घालवण्यासाठी अन्यायग्रस्त यांनी उभारलेला लढा होता.


आज तागायत भीमा पाटस साखर कारखाना कर्नाटक मधल्या एका व्यक्तीला व्यवसायासाठी दिलेला आहे तो आता मालकच होईल की काय? असा प्रश्न सुद्धा त्याला चालवण्यास दिलेल्या कागदपत्राची माहिती नसल्याने मनामध्ये निर्माण झालेला आहे


स्वातंत्र्यानंतर  संयुक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक ही प्रांतीय चळवळ सुरू आहे ती अद्याप मिटलेली नाही चेअरमन राहुल कुल यांना ही माहिती असताना सुद्धा त्यांनी कर्नाटका मधील व्यक्ती  महाराष्ट्रात आणला.त्याला. कारखाना चालवायला दिला आहे कुल यांनी या निमित्त  महाराष्ट्र चळवळीकडे दुर्लक्ष केलेले चित्र स्पष्ट होत आहे

“आमची देणे आम्ही घेऊच त्यासाठी आता कुठलीही किंमत मोजावी लागल्यास आम्ही माघार घेणार नाही” अशा स्वरूपाचा आशावाद कामगारांसमोर व्यक्त केला गेला आहे 
कर्नाटक विरोधात  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आज सुधा सुरू आहे  या कडे दुर्लक्ष करून स्थानिक प्रतिनिधीनि कर्नाटकाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी  तालुक्यात  त्यांना आणले आहे,?

आज आमचा प्रश्न आहे उद्या कर्नाटकी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचा  सुद्धा होऊ शकतो..
कर्नाटकी आणि महाराष्ट्रातील प्रांतिक लढाई अनेक वर्षे सर्वसृत असताना महाराष्ट्रातील लोकांनी उभा केलेला सहकारी साखर कारखाना कर्नाटकी माणसाच्या हातात देण्याचे पाप महाराष्ट्रातील विधानसभेतील प्रतिनिधी करतो ही बाबच खेद जनक आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही

महाराष्ट्रावर प्रेम करण्याचे सोडून हा कर्नाटकी लोभ कामगारांनाच काय ऊस उत्पादक सभासदांना ही धोक्याचा आहे असे जेष्ठ कामगार प्रतिनिधी हनुमंत वाबळे यांनी बोलताना सांगितले

तुकाराम शितोळे यावेळी म्हणाले दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केल हातात चाबूक घेऊन कामगारांच्या मागे ते चाबूक घेऊन असत त्याच्या घामाचे पैसे त्यांनी कधी बुडवले नाहीत त्यांना पगार वेळेवर दिलेला होता  इंग्रजांपेक्षा भयानक स्वरूपाची लोक इथे व्यवस्थापन प्रक्रियेत असल्यामुळे आपली ही समस्या उभी राहिलेली आहे

सुरुवातीला मलाही वाटलं होतं माझे पैसे वेळेवर मिळतील पण हा फक्त आभास होता प्रत्यक्षात मला ज्यावेळेस समजल त्यावेळेस स्थानिक व्यवस्थापक मंडळांनी हा आपल्यावर जाणून-बुजून केलेला अन्याय म्हणावा लागेल सर्वांनी एकजुटीने हा लढा शेवटपर्यंत द्यायचा असा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला…

शिवाजीराव काळे म्हणाले कामगारांवरती ही वेळ आणणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल आमच्या पैकीच आत मध्ये असणारे काही कामगार कान फुक्याच्या भूमिकेत आहे.चुघल्या करून ते स्वतःचं पोट भरण्याची सध्यातरी उपजीविका करत असले तरी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळानंतर त्यांची ही देनी मिळतील का नाही ?  याचा विचार आजच्या आमच्या  भूमिकेवरून त्यांनी. लक्षात घेतला.पाहिजे या  सर्वांची ओळख आम्हाला पक्की असून त्यांनी आपली भूमिका लवकरच बदलली नाही तर याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल अशा स्वरूपाचा इशारा युनियनच्या कार्यप्रणालीला अडचण करणाऱ्या कामगारांना काळे यांनी  दिला आहे.
पुढे ते म्हणाले आता हा लढा सुरू झाला आहे.संपूर्ण देणे मिळवल्यानंतरच पूर्ण होईल यासाठी सर्वांनी एकत्रित यायचं एकजुटीने राहायचं अशा स्वरूपाची आव्हान त्यांनी केले आहे.

कामगार दिन या महाराष्ट्रातुन निर्माण झालेला आहे हे कर्नाटकी माणसाला माहीत नाही स्थानिक लोक महाराष्ट्राच्या कामगारांचा विचार हे नष्ट करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत का ? असा प्रश्न आमच्या कामगाराकडे पाहून उपस्थित होऊ लागला आहे..म्हणूनच आज २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती गांधींच्या आयुष्यामध्ये हिंसा न करता त्यांनी आपला आंदोलन चालवलं सत्याग्रह केली चले-जावची चळवळ निर्माण करून इंग्रजांना घालवले त्या दिवसाचे स्मरण ठेवून या सर्वांनी आज भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील मुख्य प्रवेशद्वाजवळ उपोषणाला सुरुवात केलेली आहे.प्रशासन आणि सेवानिवृत्त कामगार यांचा वाद यामुळे चांगलाच चिघळला असून आगामी काळात यातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here