आवाज:लोकशाहीचा
राहू:प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखाना २५ वर्ष चालवायला दिला नाही तो विकला गेला आहे.सभादांची दिशाभूल करून त्यांना वेड्यात काढलं जात आहे.असा आरोप राजाभाऊ तांबे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दौंड तालुक्यात या नवीन वादग्रस्त विषयाने तोंड उघडले असून त्याचा विपरीत परिणाम एम.एस.सी बँके सह भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दौंड आमदार राहुल कुल आणि संचालक मंडळ यांच्यावर होऊ शकतो दोन्ही घटकांना मोठा झटका बसून त्यांच्या वर गुन्हे दाखल होऊ शकतात.
तांबे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस आणि कारखान्याचे संचालक मंडळ यांना ओरिजनल कागदपत्रे हे सर्वसामान्य नागरिकांसह कारखाना सभासद कामगारांना उपलब्ध करून द्यावी लागतील आता दुसरा पर्याय उरला नाही.
तांबे यांच्या माहिती नुसार भीमा सहकारी साखर कारखान्यावरती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन बँकांचे कर्ज होते कारखाना हा कर्जाच्या खाईत बुडाल्याने बंद पडला होता आणि नव्याने चालू करण्यासाठी कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या संचालक बोर्डाने प्रचंड मोठे परिश्रम घेऊन तो सुरू केला अशा स्वरूपाचा गाजावाजा तालुका भर केलेला.सर्वांना माहीत आहे.
मात्र कारखाना नक्की कसा सुरू झाला आज तो कोणाच्या ताब्यात आहे त्याचे मालक कोण या महत्त्वाच्या विषयाशिवाय भविष्यात तो सहकारी राहील की आज सहकारीच आहे या विषयाचे कोडे सभासदांना आणि तालुक्यातील जनतेला समजू नये म्हणून ते गुंतागुंतीचे करून ठेवले त्याची सत्यता समजू देत नाहीत, ९ मार्च २०२३ रोजी एम.एस.सी.बँक-मुंबई यांच्याशी सध्या कारखाना चालवायला घेतलेल्या निराणी ग्रुपने करारनामा केला आहे (त्याची खरी माहिती नाही)असे चित्र आणि प्रचार प्रसार संचालक बोर्डाकडून करण्यात आला आहे.प्रत्यक्षात हा करार एकाच बँकेने केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्याचा तपास लागल्यावर त्यांनी हरकत घेतली होती..
यावेळी कारखाना सुरू करण्याच्या अगोदर तुमचे पैसे दिले जातील अशा स्वरूपाचं आश्वासन बँकेला देण्यात आले आणि कारखान्याच्या पुढील कामकाजाला सुरुवात केली गेली सध्या हा कारखाना सुरू करण्यासाठी निराणी ग्रुपने कारखान्याची सर्व मालमत्ता जमीन जुमला कर्नाटक मधल्या काही बँकिंग कडे कर्ज काढण्यासाठी गहाण ठेवलेला आहे.बदल्यात १९२ कोटी रुपयांचे कर्ज त्या बँकांकडून घेऊन निराणी गृपने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मूळ रकमेमध्ये काही रुपयांची राजकीय ताकद वापरून सवलत घेतली आणि १५२ कोटी रुपये पी डी सी सी बँकेचा भरणा केला आहे.या बँकेने त्यांना सवलत दिलेला आकडा सुधा मोठा आहे त्या मद्ये सद्या कामगारांचे देणे भागले असते,कर्ज १९२ कोटी घेतलेल्या निराणीने १५२ कोटी बँकेत दिल्यानंतर उर्वरित ४० कोटी नीराणी च्या खिशात राहिले कारखाना चालू करण्यासाठी या व्यक्तीने स्वतःच्या खिशातले पैसे या प्रकाराने लावलेले दिसत नाहीत ४० कोटी रुपये मात्र कारखाना बँकेच्या घश्यात घालून आपल्या पदरात पाडून घेतले आहेत आहे सरळ-सरळ दिसून येत आहे..
निराणी ग्रुप हा आला त्यांना मोठा खर्च केला कारखाना सुरू केला आणि याचा लाभ सभासदांना मिळणार आहे हे काम चेअरमन संचालक मंडळ मोठ्या हिरारीने केले ह्या सगळ्या वल्गना तालुका कौतुकाचा ढोल मात्र राहुल कूल आणि त्यांच्या अनाजी पंतांनी पिटला आहे.प्रत्यक्षात मात्र कारखान्याची सर्वच मालमत्ता सध्या कर्नाटक मधल्या बँकांकडे पतसंस्थांकडे कर्जासाठी घाण ठेवलेली आहे.बँकेचे कर्ज पतसंस्थेचे कर्ज काढण्याचे नाटक करून निरणी सद्या सातबाऱ्यावर मालक झालं आहे
कर्ज काढण्यासाठी बँकेच्या सातबारे वरती मालक व्हावं लागतं हे सर्वश्रुत आहे.जर हे मालक नसतील तर त्यांनी कर्ज काढायला कुठल्या प्रकारची कागदपत्रे जोडलेले आहेत ही त्यांनी उघड करावी असे मी आव्हान करतो असे चॅलेंज संचालक बोर्डाला त्यांनी दिले आहेत..
सातबारा वरती नाव लागलेले असल्याने ते सध्या कारखान्याचे मालक झालेला असून संचालक आणि चेअरमन राहुल कुल तालुक्याच्या डोळ्यात धूळ फेक करून दिशाभूल करीत आहेत असा माझा उघडपणे जाहीर आरोप आहे असा खुलासा करतात..
____विश्वासघात आणि राजकीय वजनाचा चुकीचा वापर____
निराणी ग्रुपने १६ नोव्हेंबर २०२२ रोजी कारखाना सुरू करून एक सीजन केला,तो ७ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण केला आहे. त्यांनी दोन लाख ७८ हजार अधिक साखर होती निर्माण केलेली आहेत. या सर्व साखर पोत्यांचे मालक निराणी आणि कंपनी आहे सुरुवातीला कारखान्यावर कर्ज काढलं त्यातील शिल्लक राहिलेली ४० कोटी आणि आता साखरेतून व उपपदार्थ व कोजन मधून मिळणारा नफा जवळपास १५ कोटी अधिक असे मिळून जवळपास ५५ कोटी हा निराणीचा फायदा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणातून झालेला दिसून येतो.
मात्र एम एस सी बँके बरोबर झालेल्या भाडेकराराची कराराची तारीख ९ मार्च२०२३ ही आहे मग निराणी ग्रुपने २०२२ मध्ये कारखाना ताब्यात घेऊन कसा काय चालवला केला? हा प्रश्न बँकेच्या कारभारासह संचालक बोर्डाच्या कारभारावर संशय व्यक्त करणारा आहे.हे चुकीचे असल्यास त्यांनी कागदपत्रे जाहीर रित्या उघड करावी नागरिकांना द्यावीत तालुक्यात विकास कामांचा ढोल पेटण्यासाठी जसे फ्लेक्स लावलेले आहेत तशाच स्वरूपाची भीमापाटसच्या कारखान्याच्या संदर्भातील निराणी ग्रुप एम-एस-सी-बँक जिल्हा बँक आणि संचालक बोर्ड यांनी केलेल्या कारभाराचे फ्लेक्स लावावे असे आव्हान या निमित्ताने त्यांनी दिले आहे.
कराराच्या करण्याच्या अगोदर कारखाना निराणी ग्रुप च्या ताब्यात बेकायदेशीर कोणी दिला हा निराणी ग्रुप नक्की महाराष्ट्रातल्या कुठल्या लाडक्या नेत्याचा जावई आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि सभासदांच्या दृष्टीने गुंतागुंतीचा असू शकतो बँकेने करार करायच्या अगोदर त्या बँकेच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तेवरती निराणी ग्रुप कसा परस्पर ताब्यात घेतो ही बाब बँकेच्या कार्यप्रणाली वरती संशय व्यक्त करणारे आहे हा सर्व प्रकार तालुक्यातील सभासदांच्या दृष्टीने मोठा घातक झालेला आहे..
______आमदार खोटारडे आणि दिशाभूल करणारे ______
कारखान्याची मालमत्ता कर्नाटक मध्ये घाण ठेवण्यात आली कर्नाटक चा परप्रांतीय माणूस कारखान्याच्या सातबारे वरती मालक झाला त्याच्यावर कर्ज काढले त्याच कर्जाने तुमचा आमचा कारखाना चालवतोय त्यातून उलट ४० कोटी रुपयांचा नफा त्याने घेतलेला आहे एम एस सी बी बँकेच्या अगोदर करार होण्याच्या पहिले तो येतं साखर उत्पादन करतो त्यातून सुद्धा नफा कमवतो आहे सभासदांनी तुमच्याकडे स्वर्गीय सुभाष स्कूल यांचे चिरंजीव म्हणून विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला मूठ मातीत तुम्ही आहे गोड साखरेची कहाणी तुम्ही सभासदांना दिशाभूल करीत करू करून टाकली आहे
तुम्ही खोटारडे नाहीत तुम्ही दिशाभूल केलेली नसल्यास तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखान्याचे शासनाकडून ,निरांनि, आणि बँकेकडून झालेले ओरिजनल कागदपत्रांचे फलक तुम्ही लावावेत अशा स्वरूपाचे आव्हान तुम्हाला मी करतो अशी माहिती त्यांनी दिली असल्याने मोठी खळबळ उडालेली आहे..
आणि ही माहिती खरी ठरल्यास याचा दणका संचालक मंडळ आणि बँक प्रतिनिधींना बसल्याशिवाय राहणार नाही