आवाज लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
आगामी येणारी विधानसभा भाजपा पार्टीच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठीअसेल का? असा प्रश्न पार्टीत असलेल्या पण पडद्याआडच्या गटा-तटातून निर्माण झालेल्या अंतर्गत वादी वादाने निर्माण झाला आहे.
पक्षाचे सध्या राज्यात आणि देशात चांगले दिवस आहेत पक्ष सत्तेत असल्या-कारणाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठे बळ मिळालेले आहे.दौंड तालुक्यात एकेकाळी एकाकी झुंज देणारे वासुदेव काळे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत.दुसऱ्या बाजूला नव्याने आलेले राहुल कुल आमदार झाले आहेत. दोघं मद्ये अंतर्गत विळ्या भोपळ्याचे वैर असल्याचा पुरावा त्यांनीं
विकास कामाच्या लावलेल्या गावागावातील फळकावरील फोटो पाहता मिळणारा आहे दोघांनी ही या फलकांवर एकमेकांचे फोटो टाकलेले नसल्याने त्यांचा अंतर्गत वादी वाद या निमित्त चव्हाट्यावर आला आहे
काळे आणि कुल हे एकाच पक्षात असले तरी अंतर्गत एकमेकाला पाण्यात पाहत आहेत.हा प्रकार सद्या तालुक्यातील या दोघांच्या विकसा-कामांच्या फलकांमधून उघड झाला असून.आमदार राहुल कुल यांच्या वतीने लावण्यात आलेल्या गावा-गावातील विकास कामांच्या फलका-वरती काळे यांचा फोटो टाकला गेला नाही.
अशीच परिस्थिती काळे यांनी विकास कामाचे फलक लावलेत त्यामध्ये विद्यमान आमदार कुल यांचा फोटो टाकले नाही.या प्रकाराने राज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या भाजपा पार्टीचे दौंड तालुक्यातील अवस्था अंतर्गत वादावादी ने पोखरलेली आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही..
भाजपा पार्टीमध्ये आणि त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे जिल्हा अध्यक्ष यांचा सन्मान करणे उचित असते,दौंड तालुका सोडल्यास वासुदेव काळे यांना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये येथे यथोचित सन्मान मिळतो,दौंड मात्र याला अपवाद आहे.पिंपरी चिंचवड येथील पक्षाच्या आमदार उमाताई खापरे यांनी दौंड तालुक्यातील एका प्रकरणानिमित्त यवत पोलीस स्टेशनमध्ये विजिट केली होती पोलीस अधिकाऱ्यांची बातचीत आणि चहापाणी करून निघणार होत्या.
मात्र आमच्या पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे जिल्हा अध्यक्ष यांची भेट घेऊनच जाणार आहे.आणि तो आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे.अशी माहिती त्यांनी दिली होती.यावरून भाजपा पार्टीमध्ये जिल्हा अध्यक्ष चे स्थान किती मोठं आहे याचा अंदाज येऊ शकतो..दौंड मध्ये अध्यक्षांसाठी ही घटना अपवाद आहे.येथे पक्षाचे आमदार राहुल कुल हे सर्वश्री आहेत.वासुदेव काळे आणि राहुल एका तालुक्यातले असले तरी तालुक्यातील भाजपा पार्टीच्या संदर्भातील सर्व निर्णय ते घेतात अशा स्वरूपाची अनेक उदाहरणे सांगता येतील.
तालुक्यात भाजपा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम वासुदेव काळे आणि काही त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे त्यापैकी वासुदेव काळे हे पदावर असून बाकीच्यांचा पक्षात आहेत की नाही.असा प्रश्न निर्माण झालेला आहे कुल नव्याने पक्षात आले असून तालुक्यातल्या अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांचे हस्तक नेमले गेलेत आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते मात्र भूमिगत झाल्यासारखे दिसत आहेत एकंदरीत या सर्व प्रकाराचा बारकाईने अभ्यास केल्यास कुल व काळे यांच्या राजकीय प्रतिष्ठेसाठी पक्षांमध्ये अंतर्गत मोठी बंडाळी झाली असो जुने जाणते कार्यकर्ते पक्षापासून सध्या लांब दिसत असून नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाला घेरावा घातलेला आहे..
हा सर्व प्रकार ज्यांनी पक्ष पडत्या काळात वाढवला जोपासला त्यांच्यासाठी दुःखदायक असून नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी तो आनंददायी बनला आहे अंतर्गत वादा-वादीने पोखरलेल्या या पक्षाचा कारभार आगामी विधानसभेमध्ये पक्षाची अस्तित्वात टिकण्यासाठी असेल का? असा प्रश्न या सर्व प्रकाराला अभ्यासपूर्वक पाहिल्यास निर्माण होणे सहाजिकच आह