दौंड तालुक्यात ग्रामपंचायत ताब्यात नसलेल्यांना आमदारकीचे वेध !

20

आवाज लोकशाहीचा

दापोडी/खोपोडी-प्रतिनिधी


दौंड तालुक्यात विधानसभेचा चांगलाच गाजा-वाजा सुरू झाला असून तालुक्यामध्ये किती उमेदवार असणार कोणाची सरळसरळ लक्षवेधी लढत होणार या विषयाचं वादळ निर्माण झालं असेल तरी मी आमदार असलो पाहिजे या साठी काहींनी देव पाण्यात घातले आहेत तर काही स्वप्नात रंगून गेले आहेत.गावच्या राजकारणामध्ये ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यास असमर्थ ठरलेल्या दुबळ्यांना तालुक्याच्या आमदार पदाची स्वप्न पडू लागली आहेत..


सध्या तालुका विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या लढतीकडे पाहत आहे रमेश थोरात यांच्या पराभवाचा विषय शंकेला कारण बणून गेलेला आहे राजकीय सत्तेचा दुरुपयोग आणि प्रशासन त्यांच्यापुढे झालेले गुलाम यातून थोरात ७४६ मतांनी पराभूत झाले असे.समजल्यावर सुधा विजयी झालेल्या कुलांना म्हणावा असा आनंद व्यक्त करता आलेला नाही,थोरात यांचा पराभव झाला नाही त्यांची विकेट घेतली याची माहिती स्वतः राज्यातील एक माजी मंत्री आणि पुणे शहरातील एका खासदाराने उघडपणे रमेश थोरात यांना दिलेली आहे..


दरम्यान नंतरच्या पाच वर्षाच्या काळात राजकारणातील अनेक भानगडी,समाजकारणाचे विषय,जनतेच्या मान सन्मानाचा कार्यभाग,आणि अपमानित होऊनही मान खाली घालून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानहानी तालुक्यातील जनतेने  पाहिलेली आहे.या सर्व घडामोडींना तालुका कंटाळलेला असून काहीही भावामध्ये दौंड तालुक्यातील चित्र बदलण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात आहे..


याच गोष्टीचे अवलोकन गाव पुढार्‍यांना आणि थोरात यांच्याबरोबर काम करणाऱ्या राजकारण्यांना झाल्याने त्यांना आता दिव्य स्वप्न पडून आपण आमदार होऊ शकतो असा भास होऊ लागलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटा फूट झाली  पक्ष स्थापन करणारे सर्व सर्व शरद पवार त्यांच्याच आश्रयाखाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठसा उमटवलेले त्यांचे पुतणे अजित पवार यांनी स्वतंत्र स्वरूपाने राजकारणाची सुरुवात केली हा प्रकार राज्याच्या राजकारणामध्ये धक्का देणारा होता.


या दुफळीच्या  वातावरणात आणि पवार कुटुंबातील नणंद भावजय लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दोन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढले आणि हा प्रकार राजकारणाला कलाटणी देणार ठरला आहे या पाठीमागे शरद पवार यांची राजकीय कसोटी.जेवढी महत्त्वाची ठरली तेवढीच राज्याच्या राजकारणातील भाजपा पार्टीकडून जनतेला झालेल्या त्रासाचा तो बदला सुद्धा म्हणावा लागेल,तालुक्यात याचा परिणाम झाला आहे..

रमेश थोरात अजित पवार गटात गेले आणि त्यांनी राजकारणात ज्यांच्यावर विश्वास ठेऊन ज्यांना पदे दिली त्यांनी शरद पवार गटात जाणे पसंद केले.मतदारांनी भारतीय जनता पार्टीला ज्या आशेने अपेक्षणी राज्यात सत्तेवरती आणलं होते ती अशा अपेक्षा त्यांची भंग पावली होती आणि पर्याय म्हणून शरद पवार यांनी परत उभारी घेऊन दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याने त्यांनी त्यांच्या तुतारी चीन्हाला भरघोस मते दिली राजकारणातली समीकरणे आता बदलू लागले आहेत.

लोकसभेमध्ये दौंड तालुक्यातील हे दोन दिग्गज एकत्रित आले आणि भाजपाला साथ देणाऱ्या अजित पवार यांच्या पत्नी सुनीता पवार यांचा प्रचार करू लागले होते मात्र आधीच भाजपाकडून नाराज झालेला मतदार आणि अजित पवार गट जाऊन भाजपला भेटलेला असल्याने  मतदारांनी आपला रोष  मतपेटीतून व्यक्त केला हा सर्व प्रकार मतदाराच्या किमयाने घडला असला तरी तालुक्यात दुफळीच्या काळामध्ये शरद पवार गटात राहिलेले व रमेश थोरात यांच्या कडून अनेक वर्ष राजकरणात पदे भोगून पदाधिकारी झालेलं दोन कार्यकर्ते यांच्या साठी  ही मोठी परवणी ठरली गेली  आपल्यामुळेच ही किमया घडली तालुक्याच्या राजकारणावर आपलं कमांड आहे.असे त्यांचे ठाम मत झाले ज्यांची  राजकीय कारकीर्द रमेश थोरात यांच्यात सहकार्याने तालुक्यात फुलली याचा विसर पडला आहे.आज थोरात यांनी त्यांच्यावर मागील काळात ठेवलेला विश्वास त्यांनी झटकून देऊन त्या विश्वासालाच आव्हान देण्याचं काम सुरू केले आहे..


वास्तविक पाहता या दोघांनी आपल्या राजकीय ताकदीचा अंदाज आपल्या गावच्या ग्रामपंचायत मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील राजकीय अभ्यासक आणि  ग्राम पातळीवर काम करणाऱ्यां गाव पुढाऱ्यांना  पक्के माहित आहे..

तालुका दहशतमुक्त झालं पाहिजे राज्यामध्ये भाजपाचे सरकार गेलं पाहिजे लोकांवर होणारे अन्य अत्याचार अधिकाऱ्यांना होणारा त्रास यातून मुक्त झाला पाहिजे या स्वप्नात मतदार आहेत.या मतदारांच्या स्वप्नाला साकारण्यासाठी या तालुक्यामधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीने राजकारणात उभे राहिले पाहिजे हे तितकंच महत्त्वाचं असताना ग्रामपंचायत ती ताब्यात ठेवता येत नसलेल्यांनी आमदारकीची स्वप्न पाहण्यास सुरुवात केलेली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here