कुलांची जाणीव पूर्वक भूल पक्षाचे चिन्हासह नावच केले गुल…

23
आमदार राहुल कुल यांच्या पोस्टरवर भाजपाचे चिन्ह आणीं पक्ष्याचे नाव केले जाणून बुजून गायब
  ..

आमदार राहूल कुल यांनी जाणिव पुर्वक केली भुल,पक्षाला अक्षता लावुन कमळ चिन्ह केले गुल..दौंड तालुक्यामध्ये जोरदार चर्चा..

विशेष:प्रतिनिधी -एम,जी,शेलार
आवाज:लोकशाहीचा
_____________________
पुणे:प्रतिनिधी

दौंड चे आमदार राहुल कुल यांनी एकमेव स्वतःचाच फोटो टाकुन तालुका भर  मोठं-मोठे फ्लेक्स लावलेले आहेत.हे फ्लेक्स पाहुण जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जोरदार  चर्चा सुरू झाल्या आहेत.एरवी लहान  मोठा कार्यक्रमाच्या फ्लेक्स वर नरेंद्र मोदी,अमित शहा यांचे पासुन थेट कै.‌सुभाष कुल, रंजना कुल,कांचन कुल आणि स्वताचा डोळ्यात तेल घालून फ्लेक्स वर आकर्षक आणि  सुंदर फोटो छापणारया आमदार राहुल कुल यांनी पक्षाला वटाणा लावत,नेत्यांच्या फोटोला   आणि जाणिव पुर्वक पक्षाच्या कमळ चिन्ह ला अक्षता लावून एकमेव स्वताचा फोटो टाकून तालुक्यात लावलेल्या मोठं-मोठ्या फ्लेक्स ची जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे…

तालुक्यात लावलेल्या या फ्लेक्स वर आमदार राहुल कुल यांनी स्वताचाच एकमेव फोटो छापुन
“लढा स्वाभिमानाचा-
दौंडच्या विकासाचा”
असा मजकुर लिहील्याचे वाचून नेमका लढा कोणाशी,आणि  स्वाभिमान नेमका कोणाचा,आणि विकास चेले-चपाटे,यांचा असा खोचक सवाल नागरीक उपस्थीत करु लागले आहेत…

फ्लेक्स वर ते ज्या पक्षात मोठे झाले त्या पक्षाच्या देशपातळी पासुन राज्य  पातळीवरील आणी घरातील व्यक्तींचा काळजी पुर्वक फोटो छापणारया कुल यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर फोटो न छापण्याचा विसर पडला की, त्यांना त्यांचा भाजप पक्ष सोडण्याचा माणसं आहे काय? असा ही सवाल नागरीक उपस्थीत करु लागले आहेत…

सध्या दौंड मध्ये तुतारीला अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच आणखी वाढ होण्याची शक्यता म्हणजे माजी आमदार रमेश थोरात यांना तुतारी मध्ये प्रवेश व तिकिट ही निश्चित झाल्याने तुतारी जोरात आहे..थोरात हे तुल्यबळ उमेदवार म्हणून जाहीर आहे.गेल्या काही दिवसांपासून कुल यांच्या बाबत तालुक्यात नाराजी वाढून तीव्र असंतोषच  खद-खदत आहे…यास कारणे ही तशीच जबरदस्त आहेत.ती कारणे प्रचारात गाजतील.यामुळे राहुल कूल प्रचंड अडचणीत येतील असे कार्यकर्ते चर्चा करीत आहेत…

कुल यांचे बाबत ही गंभिर परिस्थीती असल्याची चर्चा आहे. या सर्व बाबत धोक्याची घंटा वाजुन लागल्यानं कुल तुतारी हाती घेण्याच्या मनस्थितीत आहेत काय ? असाही सवाल स्पष्टपणे व्यक्त केला जात आहे.नेत्यांचे फ्लेक्स वर फोटो जाणिव पुर्वक डावलले,पक्षाच्या कमळ चिन्हाला फ्लेक्स वर  वाटाण्याच्या अक्षता लावणे.हे सहज सोपे नाही यामागील कारणे पुढे येण्याची शक्यता आहे…

वाचा:विशेष — भाजप कडुन आमदार होण्याची सुतराम शक्यता नसल्याची खात्री वाटल्याने वेळ आली तर  तुतारी हाती घेवुन तालुक्यातील रमेश थोरात यांचे वर्चस्व मोडीत काढून आपणच दौंड मध्ये सर्वो-सर्वा सिद्ध करण्याचे कुल यांचे कारस्थान आहे.अशीही स्पष्ट चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here