चौफुल्यावर होणाऱ्या कामगार भेटीचे नाटक आमच्या चक्री उपोषणा वरती कोणतेही परिणाम करू शकणार नाही- जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे..
आवाज:लोकशाहीचा
पाटस:प्रतिनिधी
आमच्या चक्री उपोषणाची धास्ती घेतलेल्या चेअरमन राहुल कुल आणि त्यांच्या बगलबच्चांनी चौफुला या ठिकाणी व्हाईस चेअरमन यांच्या मंगल कार्यालयात कामगारांच्या भेटीच नाटक आयोजित केले आहे.त्यांच्या या नाटकाचा कोणताच परिणाम आमच्या उपोषणावर होऊ शकत नाही कामगार युनियन बाबत होऊ शकणार नाही अशी माहीती जेष्ठ कामगार नेते शिवाजी काळे यांनी दिली आहे…
उपोषणाचा आठवडा पूर्ण झालेला असून या पुढेही उपोषण थांबणार नाही पण आम्ही आमची देणी घेतल्याशिवाय राहणार नाही ही पक्की खबरबात आमदार तथा चेअरमन राहुल कुल यांना समजल्या कारणाने आणि आमच्या उपोषणा बाबत दिवसान-दिवस नागरिकांमध्ये आमच्यासाठी आत्मीयता वाढू लागल्याने याची धास्ती प्रचंड त्यांनी घेतली आहे ..
यातून काय मार्ग काढावा म्हणून उपोषणामध्ये फूट पडली हे दाखवण्यासाठी सध्या काम असणारे त्यांच्या मरतीतल्या काही बगलबच्चे कामगारांना त्यांनी भेटीसाठी चौफुला येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी बोलावलेला आहे हे कार्यालय कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव बारवकर यांच्या असून कारखान्याच्या प्रश्नांच्या सोडवणुक कारणासाठी हे कार्यालय कसे काय निवडले जाते हाच खरा प्रश्न असला तरी यांचा हा खोडसाळपणा आमच्या उपोषणावर ती काय परिणाम करणार आहे.
सध्या असलेल्या कामगार युनियन बाबत सुद्धा तो करू शकणार नाही आम्ही सर्व कामगार आता एक दिल न्याय हक्काची लढाई लढत आहोत.यामध्ये फूट पडल्याचे चित्र स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या काही भालदार चोपदार कामगारांना चौफुल्यावर बोलवणार भेट देणार आणि प्रसार माध्यमातून कामगारांची आणि चेअरमन राहुल कोण यांची सकारात्मक मीटिंग झाली अशा स्वरूपाच्या बातम्या छापून घेणार हे करण्याचे नाटक आयोजित केलेला आहे..
तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून या महाशयांनी अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी अनेक प्रकरणे केलेली आहेत. त्यांनी गेले सात-आठ वर्षांपासून कामगारांची दिशाभूल केली आहे.कारखाना चालवायला दिला की विकला हे सत्य कडून देत नाही.म्हणून वेग-वेगळे प्रश्न निर्माण करून मूळ विषयाला बगल देण्याची दिशाभूल ऊस उत्पादक सभासदांची केली आहे.तालुक्यातील मतदारांना विकास कामांचे गावो-गावी मोठ-मोठे फलक लावून दिशाभूल करण्याचा प्रकार केलेला आहे..
अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी कुल यांच्यावर केला असून ते म्हणतात भीमा सहकारी साखर कारखान्यावर ती कामगारांचा प्रश्न मिटवण्यासाठी बैठक घेणे गरजेचे असताना चौफुला येथील मंगल कार्यालयात का घ्यावी हाच प्रश्न म्हणजे दिशाभूल करणारा आहे.मराठीत म्हणतात ना दुखणं झालं गुडघ्याला उपचार चालल्या डोक्याला कारखाना स्थळावर असणाऱ्या उपोषणकर्त्यांचा प्रश्न त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि भलत्यांनाच मंगल कार्यालयात बोलवून सकारात्मक चर्चा झाली म्हणून बोभाटा करायचा हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखा आहे..
शिवाजी काळे बोलताना पुढे म्हणाले की,विकास कामांचे मोठे-मोठे फलक लावून तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात निधी आणला असे दाखवणारे तालुक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी गेले दहा वर्षात आणलेल्या निधीच्या आकडेवारीची झालेली विकास कामे आणि त्यांच्या गुणवत्ते बाबत ठोस स्वरूपाची माहिती जाहीर करावी निधी कोणासाठी आणला होता.त्यात कुणाच भल झाल हे यावरून स्पष्ट होईल व ह्याच गोष्टीला ते स्पष्ट करत नसल्याने तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत आहे..
भीमा पाटस कारखान्या संदर्भातही तसेच केले आहे.निराणी ग्रुपला चालवायला दिलेल्या कारखान्याच्या संदर्भातल्या बातम्या सर्व वृत्तपत्रात त्यांनी देऊन प्रसार माध्यमांना सांगून आज अखेर पर्यंत त्याची योग्य ती कागदपत्रे कोणाला समजू दिलेली नाही.ही सुद्धा दिशाभूलच म्हणावी लागेल आम्ही सेवानिवृत्त कामगार गेली आठ ते दहा वर्ष आमच्या घामाचे दाम मिळवण्यासाठी त्यांच्याशी वार-वार वेगवेगळ्या ठिकाणी कधी तोंडी कधी पत्रव्यवहाराने चर्चा करीत आलो आहोत मात्र अद्यापही आमचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आणि उद्या चर्चेसाठी श्रीकृष्ण मंगल कार्यालय मध्ये बोलवून त्यांना काय साध्य करायचे आहे.याचा बोध घेतल्यास ती सुद्धा आमची दिशाभूलच आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही..
या चेअरमन साहेबांना आम्ही सर्व कामगार आव्हान करतो की आमचे सुरू असलेल्या चक्री उपोषण आता घेतल्याशिवाय थांबणार नाही यासाठी या आंदोलनामध्ये काही बदल करावा लागला तर तो सुद्धा केला जाईल अशा स्वरूपाचे आव्हानच त्यांनी कुल यांना देताना म्हणाले मृत कामगारांचा आकडा मी आत्ता नव्याने काढलेला आहे ९० पेक्षा अधिक कामगार सेवानिवृत्ती नंतर मयत झालेले आहेत.त्यांच्या कुटुंबावर ती आर्थिक संकट कोसळलेल आहे.मात्र निवृत्तीच्या नंतरचा त्यांचा मिळणारा कष्टाचा घामाचा दाम यांच्याकडून दिला गेलेला नाही गेले दहा वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय ते आम्हाला ही देत नाही आणि उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या चर्चेमध्ये ते नक्की काय करणार आहात हा प्रश्न म्हणजे मजेशीर आहे…
कायम दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रकार करणारा म्हणून त्यांची ओळख होऊ नये येवढीच भीती आम्हाला आता वाटू लागलेली आहे.त्यांची दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारी कामगार बद्दलची चर्चा ही आमच्या उपोषण कर्त्यांसाठी आणि विद्यमान कारखान्याच्या कामगार संघटनेसाठी उचित नाही तिचा आमच्यावर परिणाम होणार नाही.आम्हाला त्यापासून काही फरक पडणार नाही अशी माहिती सुद्धा अखेरच्या क्षणी त्यांनी दिलेली आहे..