फलकाचा मजकूर आणि कुल यांचे वर्तन साम्य आहे का…?. नागरिकांच्या चर्चा

21
चौफुला परिसरात लावलेल्या फलकांवरचा मजकूर लक्ष वेधत आहे

आवाज:लोकशाहीचा
केडगाव..प्रतिनिधी

सत्ता मिळवण्यासाठी पक्ष,नेता बदलून गद्दार झाले,आणि सत्तेत आले त्यांच्या कारभाराने सेवा निवृत्त कामगार ९० अधिक मेले तालुक्याच्या कारखानदारी मद्ये आर-के नावाने हवेली वाले आले , तालुक्यातील तरुण रोजगार नसल्याने बेकार झाले, कमिशन कमवणारे बगलबच्चे झाले, ठेकेदार सगे-सोयरे केले, असे कसे दिवस तालुक्यावर आले अशी म्हणण्याची वेळ दौंड तालुक्यातील जनतेवर आली आहे…
असे दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांनी पक्ष,आणि चिन्ह विरहित फलक लावेल आहेत.फलकावरील मजकूर वाचून तालुक्यात सर्व सामान्य नागरिक बोलू लागले आहेत .

चौफुला-केडगाव रस्त्यावरती कुल आणि त्यांच्या  सल्लागार यांनी फलक लावले आहेत.लांबून दिसावे असे उंच टांगले आहेत.भाजप पक्ष पार्टीचे आमदार असूनही चिन्ह आणि नाव गायब केले आहे.मात्र मजकूर स्वभावाच्या विसंगतीचा लिहून दिशाभूल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे..
“लढा स्वाभिमानाचा , दौंडच्या प्रगतीचा”
“ज्येष्ठांचा आदर व तरुणांचा पाठीराखा”
“जमिनीवर पाय रोवून-भविष्याचा वेध घेणारा”
फलकवरील या मजकुरांचा आणि कुल यांच्या स्वभावाचा कुठेही सूत मात्र संबंध येत नाही अशा स्वरूपाची राजरोसपणे चर्चा केडगाव-चौफुला,पाटस,दौंड परिसरात नागरिकांचा टाइमपास बनलेली आहे..

स्वाभिमान कोणता? यावर ते बोलताना म्हणतात राजकारणा ची सुरुवात रमेश थोरात यांचे उपकारामुळे झाली वय नसताना ज्यांनी त्यांना चान्स दिला पुढे शरद पवार अजित पवार यांच्याशी सलगी करून राजकीय प्रवासाची वाटचाल करीत रमेश थोरात यांना गद्दार ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला,राजकीय वार पाहून धनगर समाजाचे जेष्ठ नेते महादेव जानकर यांच्याशी सलगी करूण त्यांच्या पक्षात उडी  घेतली , शरद पवारांनी अजित पवार यांच्याशी गद्दारी केली.

पाच वर्षाचा जानकर यांच्या पक्षातील प्रवास वातावरण बदलल्यामुळे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पुढे घेतली जाणकारांची बी गद्दारी केली सध्या लावलेले फलक त्याच्यावर पक्षाचे चिन्ह नाही नाव सुद्धा काढून टाकला याला भाजपाशी काय म्हणावे हा टिंगल टवळ्याचा प्रश्न उपस्थित करणार ठरत असल्याने   कुठले स्वाभिमानी म्हणून चर्चा होऊ लागली आहे..

दौंडच्या प्रगतीचा पुढे जोडलेले शब्द हे गमतीचे वाक्य आहे  गेले तीस वर्ष सत्तेत असणाऱ्या या व्यक्तीला ठेकेदारांच भलं होईल यापेक्षा वेगळी कुठली काम केले असा प्रश्न या निमित्ताने ते उभा करीत आहेत.तालुक्याचे शहर दौंड या ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्याची सोय न करू शकणाऱ्यान करोडो रुपयांच्या विकासाचे फलक तालुक्यातल्या गावोगावी लावले आहेत..

केडगाव यवत पाटस आणि दौंड ही तालुक्याची महत्त्वाची गावे आहेत.आठवड्याचा बाजार भरतो गावागावातल्या महिला भगिनी येथे येतात त्याच्या लघुशंखेसाठी सुद्धा जागा शोधता आलेली नाही.त्यांनी केलेल्या कामाचा तपशील पाहता शासनाच्या रक्कमेचा कुणासाठी उपयोग झाला हे बारकाईने पाहिल्यास त्यांचा हा कारभार ठेकेदारांच्या भल्या
साठी आहे .

ज्येष्ठांचा आदर या फलकावरील शब्दांना पाहून नागरिक मात्र आचिंबित झालेले आहे.ते बोलताना म्हणतात कारखान्यावरती बसलेले चक्री-उपोषणास या व्यक्तीला तरुण वाटतात की काय त्यांच्या उपोषणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष  करणारा हा व्यक्ती कसा असू शकतो.घरी भेटायला बोलावतो आणि चार चार तास ताटकळत ठेवतो हा त्याच्या आधाराचा प्रकार आहे.की  याचलाच तो आधार म्हणून पाहतो  अशी शंका या निमित्ताने उपस्थित करीत आहेत..

तरुणांचा कसा झाला आधार म्हणून प्रश्न उपस्थित करताना म्हणतात तालुक्यामध्ये कुरकुंभ,नांदूर,सहजपूर,भांडगाव या भागात कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे.या कारखानदारी मध्ये आर-के-ग्रुप नावाने हवेली मधील सगळे सोयरे यांची मोठे मोठे ठेके असून स्थानिक तरुणांना त्यांच्या हाताखाली बटीक म्हणून छोटे-मोठे ठेके देण्यात आलेले आहे.हे ठेके घेणारे एक तर निश्चित भक्त हवेत अन्यथा सांगकामे नामे असल्याशिवाय त्यांना काम देण्यात आलेले नाही.काही बगलबच्चे या सर्वांवर लक्ष ठेवून महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी कार्यरत आहे. इतक्या लोकांचा विषय सोडल्यास तालुक्यातील अनेक तरुण बेरोजगार असून त्यांच्या हातातला रोजगार सत्तेतील शहाणपणाने हिसकावून घेतला की काय असा या निमित्ताने सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

अशा या फलकांवरील मस्कुराने तालुक्यामध्ये टिंगल टवाळी सुरू झाली असून कोणता स्वाभिमान कोणती प्रगती कोणाचा आदर कोणता चा सोबती या सर्व बाबींची चर्चा तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून सुरू झाली असली तरी रमेश थोरात,शरद पवार,अजित पवार व महादेव जानकर यांच्याशी गद्दारी करून राजकारणामध्ये माहीर असलेल्या कुल यांनी अखेर फलकावरून पक्षाचे नाव आणि चिन्ह हटवल्यामुळे ते कुठले स्वाभिमानी आहेत हा प्रश्न तालुक्यात उपस्थित करू लागले आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here