राहुल.कुल गद्दार बेईमान त्याला पाडा…महादेव जानकर

22
पाटस येथील.निर्धार मेळाव्यात बोलताना महादेव जानकर

आवाज:लोकशाहीचा
देलवडी:प्रतिनिधी

गद्दार राहुल कुल यांना या निवडणुकीत पाडा त्यांनी माझ्यासह पक्ष्याशी बेइमानी केलेली आहे.अश्या स्वरूपाचे आवाहन रासपा चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी तालुक्यातील मतदारांना केले आहे.

या विधानाने दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून समाजातील राहुल कुल प्रेमी जानकारांना साथ देणारा का? ते गद्दार होणार हा नवा प्रश्न पुढे आला आहे..पाटस येथे पक्षाच्या वतीने निर्धार मेळावा करण्यात आला होता त्या वेळी त्यांनी कुल यांच्या बाबत संतप्त प्रतिक्रिया देत वरील आवाहन केले आहे.

या वेळी त्यांच्या सभेत राहू गावातील जेष्ठ वकील यशवंत शिंदे दुसरे वकील बापूसाहेब देशमुख,तात्यासाहेब ताम्हाणे पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके यांच्यासह पक्ष्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

जानकर बोलताना म्हणाले की राहुल कूल बेईमान आहे.पक्षाचा आमदार झाला त्या वेळी मी मंत्री होतो सर्वाधिक निधी माझा कुल याला दौंड साठी दिला त्याने साधं बोर्डवर नाव टाकल नाही,मला त्याचं दुःख वाटल नाही मात्र माझ्या पक्षाकडून मागील निवडणुकीचा अर्ज भरताना शेवटच्या क्षणी भाजपचा ए-बी-पी फॉर्म जोडला माझ्या पक्षाचा फॉर्म कचऱ्याचा डब्यात टाकला ही बाबा गद्दार असल्याची आहे.त्याने अखेरच्या क्षणी माझ्याशी आणि पक्षाशी गद्दारी केलेले आहे.

ही गद्दारी फक्त माझ्याशी आणि पक्षाची नव्हती तुम्हा सर्वांनी त्यांना मागच्या काळात निवडून दिलेल्या त्या मतदारांशी केलेली होती म्हणून या मतदारांना आव्हान करण्यासाठी आलेलो आहे.त्याला या निवडणुकीत पाडा अशा गद्दारांना निवडून देण्याची चूक करू नका.एवढेच सांगण्यासाठी मी आलो आहे.मला चांगला नवखा तरुण उमेदवार द्या त्याला पक्ष्याचे तिकीट देतो आणि राहुल कुल याला पडल्या शिवाय गप्प बसणार नाही.

पुढे ते म्हणाले माझी कोणी पोरगा-पोरगी राजकारणात नाही मला निवडणूक सुधा या पुढे लढायची नाही.मात्र अनेक गोरगरीब समाजातील मुलांना राज्यकर्ता बनवण्यासाठी या पुढील कामकाज करेल.राज्यात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही नालायक पक्ष आहे त्यांच्यावर भरोसा ठेऊ नका मात्र तुमच्याशी माझ्याशी आणि पक्ष्यांशी गद्दार झालेल्या राहुल कुल यांना माफ करू नका.असे ते बोलत होते.

या वेळी शिंदे व देशमुख आदींनी मनोगते व्यक्त करीत दौंड मधील सद्याच्या राजकारणाची वस्तुनिष्ठ परिस्थिती सांगितली.

तालुक्यात जानकर यांच्या वक्त्याने धनगर समाजाला पेच निर्माण झालेला आहे.मागील काळात कुल पक्षात असताना काही समाजाचे तरुण कुल आणि जानकर यांच्या नावाचा जागर करीत होती.सोशल मीडियावर येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करीत कुल पक्ष्याचे आणि समाजाची अस्मिता म्हणून डीनडोरा पिटत होती.त्यांच्या तोंडला या विधानाने कुलूप लागले आहे.समाजाचे कुल भक्त गुणगान गायचे सोडून गप्प गार झालेले आहेत.

तालुक्यात समाज आता काय करणार हा प्रश्न निर्माण झालेला असून समाजातील कुल प्रेमी समाजाच्या बाजूने राहणार की? समजाशी गद्दार होणार याकडे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here