आमच्या हक्काची देणी मागणे गुन्हा आहे काय? असेल तर राहुल कुल यांनी आमच्यावर कारवाई करावीच -कामगारांची हताश मागणी !

26
पाटस- भीमा सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कामगारांचे देणी मिळण्यासाठी चक्री उपोषण.

विशेष प्रतिनिधी – एम-जी-शेलार

आवाज:लोकशाहीचा



पुणे:प्रतिनिधी


आम्ही भिमा पाटस कारखान्याचे सेवानिवृत्त कामगार असुन गेली आठ वर्षे आम्ही आमची देणी द्यावित यासाठी भिमाचे अध्यक्ष व तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचेकडे विनवण्या करत आलो आहोत.देणी मागणे हा गुन्हा आहे काय? असा हताश सवाल उपस्थीत करुन गुन्हा असेल तर कुल यांनी आमच्यावर कारवाई करुन आम्हा सेवानिवृत्त कामगारांना कायमचे तुरुंगात टाकावे. अशी अतिशय विमनस्क अवस्थेत कामगारांनी प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकार यांचेशी बोलताना मागणी केली आहे..

सेवानिवृत्त कामगार आज आठ वर्ष कुटुंबाला एकही रुपयांचा अर्थीक उत्पन्न बंद झाल्याने प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. एक एक दिवस काढणे कठीण जात आहे.कोणी कोणाला मदत करणेही दुरापास्त झाले आहे.तरीही देणी मिळतील अशी आशा बाळगून दिवस मोजत आहोत. आज बावीस दिवस झालेत उपोषण सुरु करुन मात्र कुल दखल घेण्याची जाणिव पुर्वक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महसुल,पोलिस,कामगार आयुक्तालय,जिल्हाधिकारी,प्रांत आणि तहसिलदार,जिल्हा समाचार पत्र,यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून आमच्याकडे लक्ष देण्याचं जाणीव पुर्वक टाळलेले आहे.आमच्यावर होत असलेला अमानुष अन्यायाची दाद घेण्यास कोणीही तयार नाही..

यापेक्षा अध्यक्ष आमदार राहुल कुल यांचे शासनासह सर्वच यंत्रणेत प्रचंड वजन आहे.त्यांनी आपले राजकीय वजन वापरून आम्हा सेवानिवृत्त कामगार यांचे विरोधात अनाजी पंत निती वापरुन साम,दाम,दंड,भेद आणि षड्यंत्र वापरुन आम्हाला व आमच्या बायका मुलांनसह कायम स्वरुपी तुरुंगात टाकावे.देणी देता येत नाहीत.मात्र हे त्यांना सहज सत्तेच्या जोरावर करता येईल.आणि ते करुन आपली जबाबदारी बेताल,तिताल आणि बेमुरवत खोर पणे एकदाची पार पाडावी अशी त्यांनी माहिती दिली आहे..

विशेष वाचा शासन व्यवस्थेत असल्याने सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या जोरावर पुन्हा सत्ता,भिमाच्या भ्रष्टाचारामुळे मिळालेले कोट्यावधी रुपये यामुळे मस्तवाल झाल्याने कुल यांना जनतेचे घेणे देणे राहीलेले नाही. कामगारांना तर ते कवडीची किंमत देत नाहीत.त्यांच्या या वागण्याची तालुक्यात सर्व दुर प्रचंड दबाव दहशत आणि भययुक्त दादागिरी आहे.यामुळे याबाबत कोणीही बोलण्याच टाळत आहेत.यामुळे कुल प्रचंड अडचणीत आले आहेत,त्यांचे विरोधात नाराजी पसरली असुन असंतोषाचे खदखदत आहे.आणि यांच कारणाने कुल यांचा सुपडा साफ होईल असे उद्वगाने सेवानिवृत्त कामगार प्रतिनिधिक स्वरूपात मत व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here