आवाज-लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी :- विजय मोरे
कष्टाच्या घामाचे दाम सेवानिवृत्ती नंतर मिळवण्यासाठी ३२ दिवसाचा संघर्ष करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने उपोषणकर्त्या वृद्धांचा आरोग्याचा संयम बिघडू लागला आहे..
३१ दिवस सुरू असलेले चक्री उपोषण मधील पाच कामगार विविध विषयाने आणि आपल्याला पैसे मिळतील या आशेने मयत झाले आहेत.ही बाब प्रचंड गंभीर स्वरूपाची झाली आहे..चेअरमन मात्र आमदारकीचे डोहाळे लागल्याने घरोघरी आणि दारोदारी प्रचारात तल्लीन झाले आहेत
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ जवळपास ३०० अधिक कामगार वृद्ध सेवा निवृत्तीनंतर आपल्या कष्टाचे दाम मिळावे म्हणून चक्री उपोषण करीत आहेत.या घटनेला ३१ दिवस उलटले आहेत दरम्यानच्या काळात पाच कामगार मृत्युमुखी पडले असून यामध्ये एक महिला सफाई कामगारांचा समावेश आहे..
या वृद्धांपैकी अगोदरच ९० कामगारांचा मृत्यू झालेला आहे.त्यांच्या परिवाराची आर्थिक परस्थिती प्रचंड ढासळलेली आहे.त्यातील काही महत्त्वाच्या अभागण महिलांनी कारखाना स्थळी येऊन आपल्या आस्वांना वाट मोकळी करीत आपली भावना सुद्धा प्रकट केलेली आहे..
सफाई कामगार महिला भामाबाई आबा मोरे, या गरीब महिलांसह मधुकर ज्ञानदेव गिरमे,निलेश शिवाजी दिवेकर,दिलीप बाबुराव गायकवाड,रमेश सर्जेराव कांबळे या पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.
२ सप्टेंबर रोजी ही सर्व मंडळी आमच्या कष्टाचे पैसे मिळतील या आशेने या चक्री उपोषणाच सामील झाले होते.चेअरमन आणि संचालक मंडळ आम्हा वृद्धांची दखल घेईल दिवाळीच्या सणासुधाला गोडधोड करण्यासाठी सर्वच नाही पण काहीतरी देईल या अपेक्षेने आंदोलनात उतरलेली होती.ही मंडळी आता देवाघरी निघून गेलेले आहेत.त्यांच्या अपेक्षांनी दिपवाळीचे दीप त्यांच्या दारात उजळण्याची त्यांची इच्छा आणि महत्त्वकांक्षा आता अखेरची ज्योत म्हणून त्यांच्या दारात त्यांच्या नावाने लावली गेलेली आहे.ही बाब मोठी कष्टमय आणि दुःखदायक आहे..
हा प्रकार भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळासाठी अत्यंत क्लेशदायक आहे आणि या परिवाराचा तळतळाट लागणारा विषय म्हणता येईल एखादं जनावर पाळल तर ते माणसाशी ईमानाने वागते मात्र या सर्वांशी जनवरा पेक्षा बेईमान झाल्याचे चित्र या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे पाच परिवारांना कायमचं दुःख वाट्याला आलेले आहे हा प्रसंग एवढ्यावरच नसून यापूर्वी ९० अधिक कामगारांचा मृत्यू झालेला आहे..
सर्वांच्याच परिवारामध्ये आजची दिवाळी काळी झालेली आहे.कदाचित एक सहारा गेल्या म्हणून पोरकी झालेले असतील पण आज इथे बसणारी मंडळी हातावर भाकरी घेऊन ज्यावेळेस खातात तो प्रसंग सुद्धा अतिशय विदारक म्हणता येईल.दौंड तालुक्याच्या इतिहासामध्ये ही घटना लाजिरवानी असून ज्या कोणाला याबाबत शरम वाटत नसेल त्या बेशर मला सुद्धा लाज वाटेल अशी ही घटना दुर्दैवी आहे.याकडे माणुसकीने आता कोण? पाहणार की नाही,हाच खरा प्रश्न निर्माण झालेला असून या वृद्धांच्या चक्री उपोषणाला सरकार मायबाप तरी गांभीर्याने पाहिल का? नाही आता याची चिंता वाटणे सहाजिकच आहे..