पाच जण कश्याला ठेवलेत,नेत्यांचा पत्रकाराला उलट सवाल ! पाच जण कोण? शंकेचे बोट पत्रकारिते कडे !

22

                             पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ !

आवाज लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी


“पाच जण ठेवलेले आहेत तुम्हाला सांगायची काय गरज आहे” अशा स्वरूपाचे वाक्य एखादा लोकप्रतिनिधी बोलल्यानंतर पत्रकारांचे धिंडवडे निघाले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दौंड तालुक्यातील एक पत्रकारासाठी एका नेत्यांनी वापरलेले हे शब्द आहेत आणि त्या शब्दांचा आता मोठा गोंधळ उडालेला आहे.तालुका भर पत्रकारांचे आशा स्वरूपाची अहवेलना करण्याचे प्रकार हे नव्याने नसले तरी त्यांना ठेवलेले आहेत अशा स्वरूपाची भाषा म्हणजे पत्रकारिते गुलाम निर्माण झाले असल्यासारखे असून त्यांनाच कुणाकडे तरी गुलामगिरीसाठी ठेवले की काय? हा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होत आहे..

याबाबत याबाबत सविस्तर माहिती अशी की एका पत्रकाराच्या लग्न समारंभामध्ये नेते आणि पत्रकार एकत्रित आले असताना नेत्याला एका पत्रकारांने विचारले की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची माहिती तसेच विकास कामांची असणारी माहिती मिळत नाही आणि सांगितले ही जात नाही हे पत्रकारांचे शब्द संपण्याच्या अगोदरच एका दमात या नेत्याने पाच जण मी कशाला ठेवलेले आहेत अशा स्वरूपाचे उत्तर देऊन धक्कादायक स्वरूपाचा विषय निर्माण केला या प्रकाराने तालुक्यात या माणसाने नक्की काय ठेवलेले आहेत.कुणाल ठेवले आहे हा प्रश्न गुंत्याचा झाला आहे.

या प्रसंगावेळी एक ज्येष्ठ पत्रकार सुद्धा घटनास्थळी होते नेत्याला विचारलेल्या पत्रकाराने त्या ज्येष्ठ पत्रकाराला सांगितल्यानंतर मात्र या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी एक वेगळा विषयांतर करण्यात आले आणि मूळचा विषय डावलला गेला तसेच शब्द आंगलट येणार अशी परिस्थितीने त्याच्या लक्षात आल्यानंतर सदर व पत्रकाराला चहा पाण्यासाठी बंगल्यावर घेऊन या अशा स्वरूपाचा आदेश सुद्धा त्याच्या जवळकीच्या असलेल्या एका पत्रकाराला त्यांनी दिला होता.

तालुक्यात वर्तमानपत्र सोशल मीडिया वरती काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या आता प्रचंड झालेली आहे पत्रकारिता करताना नेत्यांचे समर्थन करण्याची सुद्धा त्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे या स्पर्धेतून बाहेर असणाऱ्या पत्रकारांना नेते किंमत देत नाहीत अशा स्वरूपाचा हा आरोप आहे आणि या आरोपातूनच हा प्रसंग घडल्याने आहे.आता पत्रकार गुलाम झालेत की काय?असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

याबाबत कुठल्याही पत्रकारावरती या विषयाचा आरोप नसून घटना घडल्याचं सत्य मात्र टाळता येणार नाही संबंधित नेतृत्वने यांना कशाला ठेवले हे वाक्य हे आधारित असले तरी त्याच्या कडेने फिरणाऱ्या त्या पत्रकारांसाठी ते वाक्य होतं की काय? अशी शंका येणे सहाजिकच आहे.म्हणून तालुक्यातील पत्रकारांची किंमत ही आता नेतृत्वाच्या बगलबच्चांसाठी गमतीचा विषय झाले की काय? अशी सुद्धा शंका यातून निर्माण होत आहे.

पत्रकारिता समाज व्यवस्थेमधील चौथा स्तंभ म्हणून पाहिला जातो.आता ही व्यवस्था आणि हा स्तंभ या नेत्याच्या वाक्यामुळे अडचणीत आलेला आहे. अशा स्वरूपाची पत्रकारांची अव्हेलना करण्यात आली तर भविष्य काळामध्ये वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील काम करणाऱ्या पत्रकारांना कवळीची ही किंमत राहणार नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here