आवाज लोकशाहीचा
खुटबाव प्रतिनिधी
वयाची ४० वर्ष तालुक्यातील सामाजिक कामांसाठी खर्च करणाऱ्या माझ्या वडिलांनी मला आईला आणि आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही त्यांनी वेळ वाया घालवला का ? असा प्रश्न नेहमी वाटायचां आणि दुःख ही वाटायचे आज वडील इथे नसतानाही तुमची सर्वांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती ठेवलीत तुमचे वडिलांवर माझ्यावर आणि आमच्या परिवारा वरील प्रेम पाहून तो प्रश्न निकालात निघाला असुंन त्यांनी खर्च केलेल्या वेळेची ही कमाई आहे याची मला जाणीव झाल्याने मोठा आनंद होतो आहे
अश्या स्वरूपाची माहित माजी आमदार जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांचें चिरंजिव गणेश थोरात यांनी दिली .
थोरात यांच्या घरी होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत वडील रमे थोरात यांचा अर्ज भरण्यासाठी प्राथमिक चर्चा करण्यासाठी काहीं महत्वाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात आलेल्या जनसमुदायामुळे सभेत रुपांतर झाले यावेळी त्यांनी वरील माहिती दिली
गणेश पुढे बोलताना म्हणाले वडिलांनी ज्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्यांनी त्यांना फार त्रास दिलेला आहे हे माझ्या लक्षात असू मी वडिलांसारखा ते विसरून काम करणार नाही तर वेळ आल्यास आणि संधी मिळाल्यास त्याना त्यांची आठवण करून देईल मात्र माफ करणारं नाही ही माहिती दिली
गणेश पुढे म्हणाले तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये लोकांच्या कल्याणाकरता आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी बंधू भावाने आणि आपुलकीने कामकाज करणारा आमदार निवडण्यासाठी ची निवडणूक आलेली असून तुम्हाला सर्वांना यासाठी काम करावे लागणार आहे मागील काही काळातील कामकाजाचा आढावा तुम्ही पाहता ज्येष्ठांना तापमान करून प्रशासनावर कब्जा तालुका स्वतःची मालमत्ता असल्यासारखा वापर सुरू आहे अनेकांना याची प्रचिती आली असून तालुक्यामध्ये दहशतीचे राजकारण झाले की काय अशी शंका काही प्रसंगाकडे पाहून वाटू लागते आहे
तालुक्यातील जनतेला सुनहरी मोका आलेला असून या निवडणुक मोठ्या फरकाने जिंकण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन मतभेद बाजूला सोडू काम करावे लागेल अशा स्वरूपाची विनंती उपस्थित त्यांना त्यांनी केली मी म्हणाले सोमवारी अर्ज दाखल करायचा आहे तुम्ही इथे आलेला आहात अर्ज भरायला येताना प्रत्येकाने दहा व्यक्ती आपल्या बरोबर आणावेत आणि गर्दीचा उच्चांक आपण त्या दिवशी दाखवू जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तिचा संदेश गेला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आजपासून नियोजन करू प्रत्येकाने पुढील वीस दिवस अत्यंत सावधगिरीने जागृत राहून काम करू आणि भविष्यातील पुढचा पाच वर्षाचा काळ दहशत दादागिरी यातून मुक्त करण्यासाठी काम करू अशा स्वरूपाची आव्हान त्यांनी केले
त्यांच्या निवासस्थानी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती समर्थनासाठी अचानक लाईट बंद करून मोबाईलच्या बॅटरी सुरू केल्याने तो क्षण अगदीच आगळावेगळा निर्माण झाला होता रमेश थोरात शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबुई येथे गेलेले होते त्या भेटीमध्ये काय घडलं हे ऐकण्याची उत्सुकता संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलेली होती त्यांच्या मीटिंगमध्ये काय घडलं याचा खुलासा भ्रमण दूरध्वनीवरून उपस्थित त्यांना स्वतः रमेश थोरात यांनी यावेळी सांगताना म्हणाले तुमच्या मनासारखं होईल पवार साहेबांबरोबरअतिशय चांगली मीटिंग झालेली आहे त्यांनी हे सांगताच घटनास्थळी फटाक्याची आदेश बाजी आणि टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा जल्लोष पाहण्यास मिळाला
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाची अर्ज भरण्याच्या निमित्ताने बोलावलेली कार्यकर्त्यांची मीटिंग सभेमध्ये रुपांतर झाल्याचे चित्र प्रथमच दिसून आलेले आहे या प्रकाराने आगामी काळातील दौंड विधानसभा निवडणूक राज्याच्या अन्य निवडणुकीपेक्षा लक्षवेधी होईल अशी शंका या निमीत्ताने वाटू लागली आहे