पत्रकारितेचे काम वंचित बहुजंनाच्या अन्याय अत्याचार साठी झाले पाहिजे …सोयल खान

13

आवाज-लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी

आर्थिक तडजोडीने वृत्तपत्र मालक आणि पत्रकार यांच्यासाठी क्षणिक आनंद होऊ शकतो मात्र समाजातील पिडीत पिचलेल्या दिनदलित यांच्या न्याय हक्कासाठी सडे-तोडपणे आणि वास्तव्य लिहिणे ही काळाची गरज आहे.असे जाहीर आवाहन ज्येष्ठ कार्यकर्ते सोहेल खान यांनी व्यक्त केले आहे..

दौंड येथील एका राजकीय व्यासपीठावर ते बोलत होते
त्यांच्या या अव्हानाने पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ दौंड मद्ये टीका-टिप्पणी साठी कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे असे दिसून आले आहे.

सद्या प्रसार माध्यम गुलाम गिरीला झुकलेले दिसत आहे.त्यात सर्वांचाच समावेश असेल असे नाही काही अपवाद सुधा असू शकतील मात्र बहुतांश हा प्रकार सर्वदूर दिसून येत असल्याने माणुसकीचा आवाज यात दबला गेल्याची जाणीव खान यांनी या निम्मित करून दिली..प्रत्येकाला उपजीविका करायची आहे.त्यात आर्थिक जोड नसल्यास अडचणी असतात हे सत्य नाकारता येत नसले तरी व्यवसाय असा आहे.सामाजिक अन्याय अत्याचार याला वाचा फोडणारा समूह म्हणून नागरिक पत्रकारितेकडे आशीर्वाद म्हणून पाहत असतात.यामुळे सामाजिक वंचित या लोकांचा आधार म्हणून चौथा स्तंभ गणला गेला ती पत्रकारिता आता कुठेतरी कुणाची उंबरठ्यावरती आपले जोडे झिझव ते की काय? अशी शंका खान यांच्या वक्तव्यामुळे पुढे आली आहे..शासन स्तरावरील स्पष्ट कारभाराची अनेक उदाहरणे सांगणे म्हणजे स्वतःची विद्वत्ता पाजळण्यासारखे होईल रस्त्यावरती अन्याय अत्याचाराने महिला मुलींचे अब्रू लुटली गेली याची आठवण करून देणे म्हणजे मी समाज क्रांतीचा ठेका घेतल्याचे चित्र निर्माण करून दिल्यासारखे होईल..

लोक प्रतिनिधींच्या हातून शासनाची झालेली हेळसांड एकाच ठिकाणी अनेक वर्ष तांब्र पाट घेऊन राहणारे अधिकारी ते अधिकाऱ्यांची नेतृत्वासाठी सरकारी पदावर झालेली खाजगी गुलामगिरी यातून त्यांच्याकडे जमा होणारी माया ह्या नियम आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या साठी शासनाने दिलेल्या सामाजिक विकासातील लूट याचे विश्लेषण करण्याची वेळ आलेली नाही करण सर्व गोष्टी वृत्तपत्रात काम करणाऱ्या आणि सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालणाऱ्या सर्वांनाच परिचित आहेत या सर्वांची आठवण कदाचित खान यांना झालेली असेल म्हणून खान यांनी आपल्या सडेतोड भाषणातून दौंडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्मारक आणि समोरील त्यांच्या प्रार्थना स्थळातील मज्जितचा दाखला देऊ स्पष्ट केले आहे..

ते म्हणाले काही पैशांसाठी तुमच्या संपादकांना आणि तुम्हाला सुख आणि आनंद मिळू शकतो व तुमच्या लेखणीने या समाजातील पीडित वंचित बहुजनांची प्रश्न दुःख समाजाला शासनाला आणि लोकप्रतिनिधीला दाखवण्याचे धाडस तुम्ही जे करताय ते करणे काळाची गरज आहे.
हे शब्द त्यांच्या मनातून आणि पोट तीडकीतून बाहेर आलेले होते आणि तो सुचक इशारा मीडियाच्या नावाखाली पत्रकारितेचे गोंड स्वरूप धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोचरा होता व टोचरा होता.एका दृष्टीने अपमानित करणार होता हे नाकारता येणार नाही शब्दांचा खल घालून खान यांना टीका-टिपणीच्या धने करण्यापेक्षा खान यांच्या शब्दांवरती विचार विनिमय केला पाहिजे.

खान यांच्या शब्दांचा बारकाईन अभ्यास केला तर खान चुकीचे का? आपण याचे उत्तर स्वतःला पत्रकार समजणाऱ्या सर्वांनाच मिळेल त्यांनी म्हणून आगामी काळातील हा चौथा स्तंभ नक्की गुलामगिरीकडे चुकले की काय? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.खान यांच्या वक्तव्याने पत्रकारिता एका वेगळ्या वळणाकडे चाललेले असले तरी ती दिशा बदलण्यासाठी दिलेली सूचक अशी माहिती म्हणावी का? असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो,असंच चुकलो या आधी कधीतरी किंवा चुकत असलो तरी आता परत एकदा मार्गावर येण्यासाठी हे बाळकडू किंवा डोळ्यात घातलेले अंजनच म्हणा की? काय असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उभा राहत आहे..

लोकशाहीच्या या स्तंभावरती दौंड सारख्या शहरात भर व्यासपीठावरती तळमळीचा कळकळीचा असा सूचक इशारा खान यांचा आगामी काळातल्या पत्रकारितेला दिशा देणारा ठरेल असच या निमित्ताने वाटू लागलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here