आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी……
दौंड विधानसभेच्या निवडणुकीत पैश्याचा पाऊस पडणार दिवसाच्या प्रचार पेक्षा रात्रीचा प्रचार भाव खाणार .जो देणार तो पाच वर्षात वसूल करणार आणि घेणारे मात्र त्याच्या नावाने बोट मोडीत बसणार
मतांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना मतदार भुलणार की भुलवणार हा प्रश्न मोठा गमतीचा वाटत असला तरी याचे उत्तर मतमोजणी नंतरच मिळणार .
दौंड तालुक्यात विधानसभेची निवडणूक विकास कामावर होण्याची शक्यता अजिबात नसून ती राजकीय पक्ष म्हणून सुधा होईल की नाही याची शास्वती नाही निवडणूक व्यक्ती प्रेमाकडे झुकत असल्याने उमेदवाराला मोठी चिंता आणि डोकेदुखीचा विषय होणारी दिसू लागलेली आहे .
तालुक्यात विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या लढत होणार आहे .
कुल भाजपा पक्षाचे उमेदवार असून थोरात शरद पवार गटाचे उमेदवार आहेत कुल हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असून थोरात तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे तालुक्यामध्ये या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेला असून राज्यांमध्ये सुद्धा ही लढत सर्वांना आकर्षित करणारी ठरणार आहे गेले वीस पंचवीस वर्ष सत्तेच्या कारभारात असलेल्या कुल कुटुंबाला एकेकाळी सर्वांगीण मदत करणारे रमेश थोरात आज त्यांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवताना कडवे आव्हान उभे करून राहिलेले आहेत.
कूल यांचे वय आणि थोरात यांचे वय पाहता एका तरुण युवकाला एक वय झालेल्या उमेदवाराने मोठे आव्हान निर्माण करून ठेवलेले आहे आणि गेली पंचवीस वर्ष अधिक प्रबळ विरोधक म्हणू तालुक्यात भक्कम पने कुलाना विरोधक म्हणून मागे हटले नाहीत
दौंड तालुका हा विकासाच्या कामांकडे आणि पक्षीय प्रेमाकडे पाहणारा तालुका नसून येथील मतदार व्यक्ती प्रेमी असल्याने थोरात आणि कुल यांच्यावर असलेल्या प्रेमाखातर मतदार मतदान करण्याचा विचार करणार आहे तरी सध्या देशभरात राजकारणातील उलाढाल इकडे पाहता वयोवृद्ध शरद पवार यांच्या पक्षाकडे आणि त्यांच्या कर्तबगारीतील कामकाजाचा हिशोब करून काही मतदार पवार प्रेमी सुद्धा असल्याने ही निवडणूक कूल थोरात यांच्या प्रेमाखातर असलेल्या मतदारांच्या मधील काही पवार प्रेमी मतदारांचा सुद्धा सहभाग ठेवणार असल्याने व्यक्ती प्रेमाच्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रेरित यांना अवघड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील मतदार आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे लाभ देण्याचा प्रकार निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपासून झालेले आहे आमच्या नाभिक समाजाच्या बांधवांसाठी लागणारे साहित्य तसेच भटक्या विमुक्त आणि दिनदलित समाजातील कष्टकरी मजुरांना मजूर साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आलेला आहे रुग्णांची सेवा महा आरोग्य शिबिर या विविध कार्यक्रमातून मतदारांमध्ये छाप पाडण्याचा आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलेला आहे यातूनही आपला उद्देश सफल होण्याची शाश्वती नसताना उमेदवारांकडून आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही
जो उमेदवार मतदारांना या निमित्ताने आर्थिक लाभ देणार असला तरी कष्टाने कमावलेले पैसे मतदारांना वाटण्यात कोणी पुढे येत नाही मतांची खरेदी करणारा उमेदवार हा पाच वर्षात मतदारांना वाटलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी काम करतो त्यातून भ्रष्टाचार करतो आणि भ्रष्टाचार करून माय जमा करीत असतो आणि परत पुढच्या निवडणुकीमध्ये त्यातलेच पैसे वाटण्याचा प्रताप करतो अशा स्वरूपाची रिवाज राजकारणामध्ये आहे तोच फंडा दौंड तालुक्यात बी राबवला जाईल अशा स्वरूपाची लोक चर्चा आहे वाटणारा वाटणार आहे घेणार आहे पण घेणारे वाटणाऱ्याला फसवणार आहेत का अशा स्वरूपाची शंका सुद्धा या निमित्ताने पुढे येत आहे देणारा देत राहील घेणारा घेत राहील पण यामध्ये कोण कोणाला फसवेल याचे उत्तर माझं निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल याबद्दल शंका वाटायचे कारण नाही