आवाज-लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
दौंड तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पत्राला काहीच किंमत नसल्याने संविधानिक लोकशाही मार्गाने प्रशासन काम करीत आहे का नाही असा.प्रश्न निर्माण होऊन निवडणुक कामकाज आचारसंहितेच्या मार्गाने होत नाही अशा स्वरूपाची वादळी चर्चा यवत चौफुला केडगाव पाटस परिसरातून होऊ लागलेली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा अधिकारी म्हणून त्यांचा अधिकार आहे.गणेश मारकड नावाचे हे अधिकारी असून त्यांच्या कडून झालेला आदेश सध्या एका उमेदवाराच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचा नाही असे.चित्र निर्माण झालेले आहे आदेशाला राजरोस पणे पडद्याआड करून त्याने आपला हेका मिरवला आहे फलक लावून आचार संयतेचा भंग होईल असे कामकाज केलेले आहे
.या प्रकाराने तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कारभाराला काही किंमत नाही का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,विधानसभा १९९ दौंड साठी २० तारखेला मतदान होत आहे.दरम्यानच्या काळात प्रचाराची रणधुमाळी उडालेली आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आयोग तर्फे आचार सहितेच बंधन असल्याने त्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते.गणेश मारकड नावाचे अधिकारी त्यासाठी काम करीत आहेत त्यांचे कडून रमेश थोरात नाव असलेल्या उमेदवाराला तालुक्याच्या आकरा ठिकाणी प्रचाराचे फलक लावण्याची परवानगी दिलेली दि-११नोव्हेंबर रोजी दिली असून ती १८ नोव्हेंबर पर्यंत दिलेली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात फलक लावणाऱ्या उमेदवाराने फलकावरील मजकुरात प्रकाशक आणि प्रशासन यांचा नाव,पत्ता ठळक अक्षरात टाकले पाहिजे असे नमूद केले आहे.
फलक लावले गेले असून त्यात प्रकाशक आणि प्रशासन यांच्या बाबतची माहीत टाकलेली नाही.हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाचे उमेदवार रमेश किसनराव थोरात यांनी तक्रार मेल केलेली असताना अधिकारी यांनी मात्र या बाबत कोणत्याच स्वरूपाची कारवाई केलेली नाही असा आरोप होऊ लागलेला आहे.
या सर्व प्रकाराचा विचार करता संबंधित विभागात काम करणाऱ्या अधिकारी श्रीमती भंडारे यांना फोन वरून मेसेज करून विचारणा केली असता त्यांनी रिप्लाय दिला नाही.हा सर्व प्रकार पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रालाच किंमत नाही का? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे..