४४ दिवस उपोषण करणारा सहकारी मेला आजुन किती मृत्यू पाहणार राहुल कुल – हनुमंत वाबळे

18

आवाज:लोकशाहीचा
पाटस_प्रतिनिधी

सेवा निवृत्त कामगारांच्या आंदोलनातील अजून एक कामगाराचा मृत्यू झाला आहे.गोरख तुकाराम काळखैरे हे सेवा निवृत कामगार असून त्यांनी उपोषणात ४४ दिवस सहभाग ठेवलेला होता.त्यांना कारखान्याकडून जवळपास दहा लक्ष अधिक रुपयांचे येणे होते.

सुपे परिसरातील आवर्षण भागातील काळखैरेवाडी येथील हा कामगार आज देवाघरी गेला आहे.मृत पावलेल्या कामगारांचा आता १०० ला आकडा गेला असून चेअरमन साहेब अजून किती मृत्यूची वाट पाहणार आहात अशा स्वरूपाचा आक्रोश सेवानिवृत्त कामगारातील प्रतिनिधी हनुमंत वाबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे.

कामगारांच्या देण्याच्या संदर्भामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना हा बदनाम झाला असून राजकीय सत्तेचा वापर करीत सर्व प्रकरण दडपण्यासाठी चेअरमन यांनी प्रसारमाध्यम आणि शासन यांच्यावर आपली ताकद खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे.मात्र सत्य झाकल जात नाही आणि मुद्दा झाकून राहत नाही अशा स्वरूपाची अवस्था भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दौंड तालुक्यात निर्माण झाली असली तरी निवडणुकीत मला विजय मिळवा म्हणून या सर्व मृत्तांच्या कुटुंबांना दुर्लक्ष करीत मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी उत्तम असून जनता जनार्दनांच्या संदर्भामध्ये मला मोठा कनवळा आहे.मीच विकास करू शकतो मीच आरोग्यद्युत मीच सर्व काही अशा स्वरूपाच्या घमंड मध्ये राहुल कुल सध्या वागत आहेत.

४४ दिवस आमच्यात बसणारा आमचा सहकारी शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावला असल्याने आम्ही सर्वजण व्यथित झालेला आहोत हा आमचा सहकारी बारामती तालुक्यातल्या सुपा गावच्या काळखैरे वाडी येथील रहिवासी असल्यामुळे आम्हाला त्याच्या अंत्ययात्रेसाठी तिकडे जावं लागलं अन्यथा तो दौंड तालुक्यातील असतात तर त्याची प्रेत यात्रा आणि अंतिम विधी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोरच आम्ही केला असता अशा स्वरूपाची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे.

माणुसकीचा कवडीमोल लवलेश नसणारे राहुल कुल आज सत्तेच्या जोरावर उपस्थित आहेत.भीमा सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिघडून टाकून स्वतःच्या मालकीसाठी धडपड यांनी केलेली आहे.त्यांना या निवडणुकीत वीस तारखेला मतदानातून मतदार आपले जागा दाखवून देतील यात शंका नाहीच.

मात्र या मृत कामगारांच्या कुटुंबाची हळद आणि तळमळ राहुल कुटुंबाच्या परिवाराला सुद्धा लागल्या शिवाय राहणार नाही अशा स्वरूपाची व्यतीत माहिती सुद्धा वाबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here