बाबासाहेबांच्या नावाचे फडणवीस यांना कोड का?

16

आवाज-लोकशाहीचा
केडगाव:प्रतिनिधी

वरवंड सभेत  देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचे टाळले ?

कायद्याच्या राज्यामध्ये राज्यघटनेवर चालणाऱ्या राजकारणात भाजपा नेत्यांना  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्यासाठी अडचण होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील वरवंड येथील सभेत हा विषय टाळल्यामुळे दलित वर्गामध्ये याचा फार मोठा तीव्र संताप निर्माण झाला आहे..

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवंड येथील आमदार राहुल कुल यांच्या प्रचाराची सांगता सभा घेतली,या सभेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोउल्लेख केला संभाजी महाराजांचा नाम उल्लेख केला मात्र राज्यघटनेवर चाललेल्या देशाच्या राजकारणाला लक्षात ठेऊन राज्याचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नामुलेख केला नाही याचा विपरीत परिणाम आंबेडकरी जनतेवर झालेला आहे.परिणामी याचा फार मोठा संताप व्यक्त होत आहे.

दौंड शहरातील काही दलित तरुणांनी मन मोठं करून राजकारणामध्ये भेदभाव नसावा मतांमध्ये दुरावा नसावा या शुद्ध हेतूने राहुल कुल यांना पाठबळ दिलेला आहे.राहुल कुल हे भाजपाचे उमेदवार असताना सुद्धा या सर्व तरुणांनी त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार केलेला आहे.त्या भाजपचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय जाणून बुजून केलेला आहे असा समज झाला असल्याने आंबेडकर अनुयायी सध्या वैतागले आहेत.

दिल्लीच्या जंतर-मंतर वरती राज्यघटना जाळण्यात आली.या काळात भाजप चे सर्व साम्राज्य असताना सुद्धा सरकार ने ब्र शब्द काढला नाही, वरवंड येथे फडणवीस यांनी केलेला हा प्रकार त्यातील एक भाग आहे का असाच प्रश्न या निमित्ताने समोर येतो आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याने आगामी काळामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपकडून राज्यघटनेला तीलांजली देण्याचा कार्यक्रम तर यांनी आखला नाही का? अशा स्वरूपाचा प्रश्न आता या दलित वर्गामध्ये निर्माण झालेला आहे..

महाराष्ट्र ही संतांची,वीरांची भूमी आणि महापुरुषांची भूमी आहे.वारंवार भाजप कडून महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,राजा शिव छत्रपती शाहू महाराज यांचे वारंवार कुठे ना कुठे अवहेलना करण्याचा प्रयत्न झालेला आहे..

याकडे सत्तेत असणाऱ्या काही राज्यकारण्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आपल्या खुर्चीला वाचवण्यासाठी ही घटना टाळलेली असल्या तरी आता निवडणुकीच्या काळामध्ये फडणवीस यांनी दौंड मध्ये केलेले हे कृत्य म्हणजे त्यांच्या अंतर्गतातून निघालेले हे प्रामाणिक मत आहे.अस ठाम विषय आता तालुक्यातील युवकात झाला असून

आगामी काळात बीजेपी साठी आता फार मोठा धोका भाजप दलित वर्गाला दिला जातोय  दौंडचे सर्व दलित बांधव याचा वचपा मतदानातून काढतील अशा स्वरूपाच्या आता आनाभाखा घेण्यास सुरुवात केलेली आहे.याचा परिणाम मतदानातून दाखवला जाईल अशी वादळी चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here