दौंडच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील लोकांनी कंबर कसली? तालुक्यात प्रामाणिक कार्यकर्ते वाहत की नाही – तालुक्यातील जनता धडा शिकवणार
हवेली तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना दौंड तालुक्यातील निवडणुकीमध्ये एवढा इंटरेस्ट का ? नागरिकांच्या चर्चा..
आवाज-लोकशाहीचा
राहू:प्रतिनिधी
दौंडच्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील लोकांनी कंबर कसली असून दौंड तालुक्यात दोन दिवसापासून रात्रीच्या हवेली तालुक्यातील काही नागरिक आलिशान गाड्यातून घिरट्या सुरू झालेले आहेत.
कोणत्या उमेदवाराच्या प्रचार्थ ही हवेली तालुक्यातील सेना दौंड तालुक्यात का घुटमळत आहे.त्यांना तालुक्यात नक्की कोणत्या प्रचाराला आणले गेले आहे हा समज आणि गैरसमज सर्वत्र पसरू लागेला आहे..
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आचार संहितेच्या नियमा नुसार थांबला आणि मतदानासाठी राहिलेल्या एक दिवस एक रात्रीच्या दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी विविध स्वरूपाच्या युक्त्या आणि कल्पना लढवलेले आहेत.
सध्या मतदारांना दिवसाचा प्रचार सोडून रात्रीच्या प्रचाराकडे खेचण्यासाठी उमेदवारांनी आप- आपली ताकद खर्ची घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.सध्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुणे,हवेली,पिंपरी चिंचवड व लोणी काळभोर,थेऊर,उरळीकांचन लोणीकंद या परिसरातील आलिशान गाड्या आणि त्यामधील कार्यकर्ते गेले दोन दिवसापासून तालुक्यामध्ये घीरट्या घालू लागलेले आहेत.
स्थानिक पातळीवर यांची कोणाचीच ओळख नसल्या कारणाने तालुक्यातील प्रत्येक गावातील काही भामटे चिमटे कार्यकर्ते यांच्या जोडीला असून त्यांनी मतदारांना पर्यंत यांना घेऊन जाण्याचा जणू विडाच उचललेला आहे.अशा स्वरूपाची वस्तुनिष्ठ परिस्थिती केडगाव,बोरीपारधी,चौफुला या परिसरामध्ये गेले दोन दिवस दिसत आहे.
रात्रीचा हा प्रचार आणि त्यात आलेले हे युवक त्यांच्यासाठी असलेल्या आलेशन गाड्या दौंड तालुक्याने प्रथमच पाहिलेल्या नाहीत मात्र अनेक निवडणुका नंतर या निवडणुकीत मात्र त्याचे प्रमाण मोठ्या संख्येच आहे..
दौंड शहरातील एक हॉटेलमध्ये आलिशान कमरे या युवकांसाठी बुक केलेले आहेत.त्याच पद्धतीचा प्रकार केडगाव परिसरामध्ये दिसून येत आहे.
महागड्या गाड्या गळ्यात सोन्याची गोफ आणि भरदार असणारे हवेली परिसरातील तरुण कार्यकर्ते कमी आणि गुंडच जास्त जाणवू लागले आहेत अशा स्वरूपाची दबक्या आवाजाची चर्चा केडगाव बाजार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे.
विधानसभेची ही निवडणूक कोण जिंकणार आणि कोण हरणार ही बाब निवडणुकीच्या निकाला नंतरची असली तरी प्रचारात दहशत कोणी ? केली,कोण हवेली,पिंपरी चिंचवड वरून कोणती माणसे यांना घेऊन आले यावर मात्र मोठा वादळी चर्चेचा पसारा सुरू झालेला आहे.
बुधवार दि २० रोजी या निवडणुकीसाठी मतदारांवरती अशा स्वरूपाचा प्रयोग सुरू असल्याने गेले दोन दिवसाच्या रात्री दौंड तालुक्यातील मतदारांसाठी काळरात्र ठरलेले आहेत.