आवाज:लोकशाहीचा
दौंड:-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक आता आचारी (स्वयंपाकी) झाला आहे.भविष्यात चिमुकले विद्यार्थी वाढपे (वेटर) होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या प्रकारात सरकारचे धोरण त्यात शैक्षणिक मरण अशी अवस्था निर्माण झाली असल्याने गरिबाच्या शिक्षणाचा पाया उखडून टाकण्याचा डाव यात दिसू लागला आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार सध्या शासनाच्या पंतप्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या कारभारा कडे पाहिल्यास शिक्षक हा आचारी केला आहे याची प्रचिती येऊ शकते आणि त्याने स्वयंपाक करण्यात वेळ घालवला की आपो-आप शिक्षणा कडील त्याचे लक्ष कमी होऊन विद्यार्थी वंचित राहणार परिणामी त्याला जेवण्याच्या पंगतीत वेटर चे काम करावे लागणार का? ही अशी शंका निर्माण होणे साहजिकच आहे..वरील योजना बारकाईने अभ्यासल्यास शिक्षक आचारी आणि विद्यार्थी वेटर हे चित्र डोळ्यासमोर आल्या शिवाय राहणार नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की जिल्हा परिषदेच्या शाळेत गावकऱ्यांच्या सर्वसामान्य बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणाची पाया भरणी केली जाते.याच ठिकाणी शिक्षणाची गोडी निर्माण झाल्यावर त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाचा प्रवास सुरू होऊन भविष्यासाठी त्यांना मोठी मदत होते.त्यांची मदत ठरणारी शैक्षणिक पायाभरणीच खिळ-खिळी करून त्यांना गुलामगिरी च्या वाटेकडे नेण्याचा कासव गतीचा प्रकार या निमित्ताने समोर येतो आहे..
शिक्षक सध्या अवांतरित कामांमध्ये प्रचंड गुंतवलेला असतो त्या कामातून त्याला अध्यापनासाठी अतिशय कमी वेळ मिळतो या कमी वेळातल्या प्रकाराने शिक्षण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.ही बाब जितकी महत्त्वाची आहे त्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळूच नये? मिळालं तर त्याची गुणवत्ता खराब असावी आणि देणारे सुद्धा इतरत्र कामात गुंतवून टाकवण्याचा प्रकार शासन हळू-हळू करू लागलेला आहे..
यामध्ये प्रमुख घटक असणाऱ्या शिक्षक सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा आचारी झालेला आहे.गावाकडे त्याला स्वयंपाकी सुद्धा म्हणतात याला या योजनेच्या अंतर्गत काही नियम अटीची तरतूद करून विद्यार्थ्यांची काळजी आहारा साठी कुठली घ्यायची त्याचा एक वेळापत्रक देण्यात आलेला आहे.
महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शाकाहारी पुलाव हा सोमवारचा मुलांसाठी बनवण्याचे काम या शिक्षक वर्ग करीत आहे.हा पुलाव बनवण्यासाठी त्याला पुलावा साठी लागणारे साहित्य मीठ मिरची ते हळद मिरी जिरी मोहरी पर्यंत याची नोंद ठेवावी लागत आहे.
सरकार या सर्व वस्तू देतात पण वापर किती करायचा याचा तपशील शिक्षकाने नोंदवहीत करने बंधनकारक असल्याकारणाने मिलिग्रॅम या मोजमापा पासून त्याला चोख हिशोब ठेवणे काळाची गरज आहे..
सोमवारी पहिल्या आठवड्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव देणारे या शिक्षकाला मंगळवार दिवशी मसाले भात करून द्यायचा आहे.तर शाकाहारी पुलाव आणि मसालेभात हे दोन्ही प्रकार तांदळा तले असले तरी यामध्ये वापरणारे साहित्य अन्य हे वेगवेगळे आहे.
शासनाने सर्वच साहित्य दिलेल आहे का? याच्या तपशील तर पाहता कुठल्यातरी प्रकारचा यामध्ये निश्चित असते आणि त्याला गोंडस नाव पोषण आहार दिलेला असल्याने तक्रार करणे क्रमपात्र नाही.मंगळवार दिवशी मसाले भाता नंतर बुधवारी त्यांना अंडा पुलाव अनुक्रमे मध्ये दिलेला आहे.गुरुवारी त्यांना मटार पुलाव द्यायचा आहे.शुक्रवारी मूग डाळ खिचडी आणि शनिवारी चवळी खिचडी अशा स्वरूपाचे मेनू कार्ड देण्यात आलेला आहे.
दुसऱ्या आठवड्याच्या मेनू कार्ड मध्ये सोमवार दिवशी त्यांना हरभरा पुलाव मंगळवारी सोयाबीनचा पुलाव बुधवारी परत अंडा पुलाव, नंतर मसूर पुलाव, मोड आलेल्या मटकीची उसळ आणि भात आणि शनिवारी त्यांना गोड खिचडी द्यायची आहे..
या दोन आठवड्याच्या मेनू कार्ड मध्ये जी पाककृती इंधन आणि भोजनालयाचा खर्च करायचा तो मुख्याध्यापक यांनी ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादितच करायचा आहे.त्याचा तपशील त्यांनी खालील प्रमाणे दिलेला आहे.या तपसीलामध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक वर्गासाठी प्रति देणे,प्रति विद्यार्थ्यांच्या पाठीमागे इंधन भाजीपाला या अनुदानासाठी २ रुपये ८ पैसे खर्च करायचे आहेत.
सहावी ते आठवी या विद्यार्थ्यानसाठी त्यांनी ३ रुपये ११ पैसे एवढे खर्च करायचे आहेत या खर्चाच्या तपशील काटे-कोरपणाने करणे बंधनकारक आहे.यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे तफावत झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक याला स्वीकारावी लागते.
शाकाहारी पुलाव करायच म्हटल तर त्यांनी प्रमाण दिलेला आहे.१ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना ८० ग्रॅम तांदूळ आणि सहावी ते आठवीच्या मुलाला १२० ग्रॅम तांदूळ वापरायचे आहे.यामध्ये वटाणा पहिली ते पाचवीसाठी १० ग्रॅम असून तो सहावी ते आठवीसाठी १५ ग्रॅम आहे.
मीठ पहिली ते पाचवीसाठी २ ग्राम वापरायचा असून पाचवी आठवी साठी ३ ग्रॅम वापरायचा आहे.हळद ही १० मिलिग्रॅम पहिली ते पाचवीसाठी असून २० मिलिग्रॅम ही सहावी ते आठवीसाठी आहे.कांदा लसूण मसाला ३ ग्रॅम पहिले ते पाचवीसाठी असून सहावी ते आठवीसाठी तो ४ ग्रॅम वापरायचा आहे.
यामध्ये मोहरीचं प्रमाण सुद्धा ठरवून दिलेला आहे.सोयाबीन खाद्यतेल ५ ग्राम ते ७.५० ग्रॅम पर्यंत वापरायचे जिरे असेल या सर्व वापरलेल्या वस्तूंचा काटे-कोरपणाने वापर करून याच्या नोंदी ठेवणे अत्यंत महत्त्वाचा आहे..
लग्न सोहळ्यामध्ये एखाद्या आचरयाने आपल्याला लिस्ट द्यावी आणि त्याप्रमाणे आपण मटेरियल आणावं आणि त्याला स्वयंपाक करून लोकांना जेवाय घालावं हा साधारण लोक रिवाज आहे.शाळेतील या शैक्षणिक आचार्याने मात्र प्रचंड मोठ कोड शासनाने तयार करून त्याच्यासमोर ठेवलेला आहे.धान्याची नोंद मिठाची नोंद मिरचीची नोंद हा सर्व प्रकार या शिक्षकाला करावा लागतो,यातून कमी जास्त पणा झालास वापर कमी जास्त झाला तर त्यांना स्वखर्चाने त्याच्यात ते भरून त्या विद्यार्थ्यांना ती द्यावं लागत आहे.यापैकी कुठल्याही स्वरूपाच्या पाक कृतीमध्ये हलगदरीपणा झाला तर संबंधातील काहीतरी गावकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यात या ऐवजी त्याचा मोठा इशू करून त्यांना बदनाम करण्यास सुद्धा मागे पुढे पाहायच नाही.
अशा स्वरूपाचा हा शिक्षक आचारी कामात व्यस्त झाल्यावर मुलांच्या शिकवण्याकडे तो कसा लक्ष देईल हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो
शासन स्तरावरती ही योजना देणे मागचे उद्दिष्ट हे काहीतरी स्वरूपान योग्य असेल असं आपण जरी विचार केल्यास यामध्ये जाणारा वेळ यासाठी लागणारा स्वयंपाकी त्याची भूमिका कशी असावी आणि त्यामध्ये हा शिक्षकच का? हा प्रश्न विचारात का? घेतला नाही हा खरा प्रश्न आहे.मुलांना आहार देऊन तंदुरुस्त करणे हा अतिशय स्तुत उपक्रम सरकार करत असले तरी त्याच मुलांच्या शिक्षणाला अडचण निर्माण करण्याचं काम प्रामाणिकपणाने करते की काय? ही गोष्ट या निमित्ताने शंकेची वाटू लागलेली आहे..