आवाज-लोकशाहीचा
दौंड:प्रतिनिधी
शाळेचा शिक्षक सालगडी ? भाग-२
शासनाचे धोरण शैक्षणिक मरण
शिक्षणाचे कार्य सोडून वेगळ्याच कामात गुंतवलेल्या शिक्षकांना शासनाने सध्या सालगडी असल्यासारखे वागण्याचा प्रयत्न सुरू आहे.
विद्यार्थी जडण घडणेसाठी त्यांचा घाम काढण्याचे सोडून त्यांना वेगळ्याच कामांचां प्रचंड वैताग दिला आहे.मतदार यादी,ऑनलाईन प्रक्रिया,विद्यार्थी जमा करून शाळेत आणणे त्याची काळजी घेणे या पेक्षा अधिक कामे त्यांना करावी लागत आहेत.
मीठ मिरचीची नोंद ठेवणारा शिक्षक शिक्षक राहिला नाही.पगार घेतोय म्हणून त्याला सालगडी करून ठेवले आहे.परिणामी शिक्षण घेणारे वंचित राहून त्यांचे भविष्य अंधारमय करण्याच्या नवीन नवीन युक्त्या सरकार दरबारी केला जात आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.
तालुक्यात जवळपास ८५० जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत.त्या साठी २० केंद्रे बनवलेली आहेत.एका केंद्रात जवळपास १५ ते २० शाळांना कंट्रोल म्हणून केंद्र शाळा केली गेली आहे.मात्र २० केंद्र प्रमुख दिलेले नाहीत.सद्या १० जनानीच हा २० केंद्राचा गाडा चालवलेला आहे..
यात प्रभारी केंद्र प्रमुख असून या प्रभारी केंद्र प्रमुखांना या २० ते १५ शाळेमध्ये विविध स्वरूपाच्या माहितीचं संकलन करावा लागतो हे संकलन पद्धतशीर प्रमाणे आणि नोंद करीत ऑनलाइन स्वरूपाने पुढील माहितीसाठी पाठवण्याची व्यवस्था करावी लागते,सध्या ५ वी ते ७ वी साठी पदवीधर शिक्षकांची गरज असते हेच पदवीधर प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून काम करतात अशी माहिती मिळत आहे.
ज्या गोष्टी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाहीत त्याकडे विशेषता लक्ष देण्यासाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचे संकलन करणे त्या विनाकारण परीक्षा घेण्यात त्याचा रेकॉर्ड तयार करणे ते ऑनलाईन पद्धतीने भरायचा असतं त्याच्यात हलगदरीपणा न करणे ही कामे बिन कामाचेच करावी लागतात.
निपुण भारत नावाखाली चाचणी परीक्षा घेण्याचा एक प्रकार वेगळाच आहे.या सर्व चाचणी परीक्षेचा रेकॉर्ड वेगवेगळ्या संगणक प्रकरणांमध्ये तो भरून व्यवस्थित करावा लागतो यासाठी या चाचण्यांचा उपयोग आणि त्या रेकॉर्डचा उपयोग विद्यार्थ्यांना मात्र कवडीचा होत नाही अशा स्वरूपाची अंतर्गत माहिती मिळत आहे..
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दृष्ट्या चार चाचण्या नेहमीच घेतल्या जातात या चाचण्यांचा फायदा विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या साठी निश्चित होतो हे असणं गरजेचं सुद्धा आहे.पण निपुण भारत आणि त्याच्या अगोदर सुद्धा काही चाचण्या त्याला प्याट परीक्षा नावाखाली वेगळाच चाचण्या घेऊन त्यांच्या नोंदी ठेवून शिक्षकांचा जीव घेण्याचं काम जणू या निमित्ताने होत आहे.अशी शिक्षणामध्ये परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे..