बिबट्याने दौंड तालुक्यात दहशत केली आहे ऐका महिलेचा जीव घेतलेल्या बिबट्याने १२तासात अनेक ठिकाणी दहशत केली आहे

9
दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत ऐक महिला केली ठार अनेक कामगारांना केली गरर्गुर..

कडेठाण येथील घटना बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू!वनविभागाला ग्रामस्थांनी धरले धारेवर

आवाज:-लोकशाहीचा
वरवंड:प्रतिनिधी

कडेठाण (ता.दौंड) येथील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्यांना हल्ला करून तिचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दौंड तालुका सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आहे.काही दिवसांपूर्वीच बोरीपार्धी हद्दीत बिबट्याने सहा महिन्याच्या बाळाचा बळी घेतल्यानंतर आता तालुक्यातील कडेठाण येथे घटना घडली आहे.

दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरक्षा धुमाकुळ घातला आहे.भीमा नदीच्या पट्ट्यात असलेल्या दौंड तालुक्यातील कानगाव,हातवळण, नानगाव,कडेठाण दापोडी या गावांसह शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा , गणेगाव,सादलगाव,वडगाव रासाई या भागात बिबट्याने तांडव केले आहे.

शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार करणारा बिबट्या आता माणसाचीही दिवसा-ढवळ्या शिकार करू लागला आहे.जी भीती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होती ती भीती आता खरं ठरू लागली आहे.

वन विभागाच्या निष्कर्ष आणि हलगर्जीपणामुळे दौंड तालुक्यात दोघांचा निष्पाप बळी गेला आहे.दौंड तालुक्यातील कडेठाण हद्दीत शनिवारी दि ७ रोजी सायंकाळी चार वाजता च्या आसपास शेतकरी धावडे ह्यांच्या शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय ५० ,रा.कडेठाण) यांच्यावर बिबट्या अचानक हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफडत नेले.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने पुन्हा एकदा दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

विशेष वाचा

  • वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड राहुल काळे संबंधित बिबट्या ला लवकरात लवकर पकडण्यात येइल !
  • योगेश दिवेकर शेतकरी कडेठाण असे हल्ले केलेले बिबट्या हे नक्की सोडता कुठे याचा जाब विचरण्यात आला आहे.
  • गावचे पोलिस पाटील सुहास दिवेकर कडेठाण येथे बिबट्याने केलेल्या हल्लात महिला ठार झाली असून या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here