बारामती शहरातील खुनातील आरोपींना पोलीसांनी बारा तासात केली अटक,पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे काळाची गरज- अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार !
आवाज:-लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी:-विठ्ठल होले
बारामती शहरात दोन दिवसापूर्वी रात्री अकराच्या सुमारास तेवीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला व आरोपी फरार झाले होते सदर आरोपींना बारा तासातच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मधील खंडाळी या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे..
पोलिसांच्या कामगिरीमुळे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांना प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षीस दिले आहे..
यावेळी पत्रकारांशी बोलताना गणेश बिरादार यांनी सांगितले या घटनेमुळे पाच कुटुंबावर याचा आघात झाला आहे,एक युवक जिवानिशी गेला,तिघाजनाना तुरुंगवास भोगावा लागला आणि ज्या मुलीसाठी हे घडले तिच्याही मनावर आघात झाला,त्यासाठी आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवणे ही काळाची गरज आहे,आपला मुलगा मुलगी कोणाच्या संगतीत राहतात,कोणाशी बोलतात,त्यांचा मोबाईलचा डीपी,स्टेटस,सोशल मीडिया चे ऍप वापरतात कोणाशी चॅटिंग करतात याची खात्री करा,तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे,त्यामुळे बेफिकिरी वाढली आहे,आणि त्यातूनच अशा घटना घडत आहेत,त्यासाठी आईवडिलांनी मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे..
गणेश बिरादार पुढे म्हणाले आपण शक्ती अभियान राबविण्यात आले आहे त्याचा मोबाईल नंबर 9209394917 असा आहे.आपल्या आसपास,गावात,शहरात,शाळा,महाविद्यालय परिसरात काही घडू शकते त्यासाठी हा नंबर देण्यात आला आहे,या नंबरवर फोन करून माहिती द्यायची आहे,माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव (गुप्त)गोपनीय ठेवण्यात येईल,या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे..
चुकीचे स्टेटस,मेसेज, इंस्टाग्राम,फेसबुक वर कोणाच्या भावना दुखावतील अशा रिल्स पाठवणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..
सदर खुनाच्या घटनेची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधीक्षक बापूराव दडस स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे,सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ,पोलीस उपनिरीक्षक सतिश राऊत,पो हवा आभिजित एकशिंगे,पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे यांनी केली आहे.पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके पुढील तपास करीत आहेत.